मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या(Aryan Khan) जामिनावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र भाजपचे आमदार राम कदम(Ram Kadam) यांनी यासंदर्भात ट्वीट करुन आर्यनच्या जामिनासाठी प्रार्थना केली आहे. राम कदम यांनी म्हणाले की, 'प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे.'
आर्यन खान प्रकरणाबाबत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर भाजप पेटून उठली आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी प्रश्न विचारला की, ड्रग माफियांशी महाराष्ट्र सरकारचे काही संबंध आहेत का? शिवसेना नेते आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. भाजप कधीच आर्यन खान किंवा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही. आम्ही शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराच्या विरोधात नाही. त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, असं राम कदम म्हणाले.
या धोकादायक प्रकरणात महाराष्ट्र सरकार ड्रग माफियांच्या विरोधात उभे राहील अशी अपेक्षा होती, पण खेळ त्यांच्यावरच उलटला. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही आगामी निवडणुकीसाठी या प्रकरणाचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरातील तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रगच्या विरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र येऊ शकतात का? बरं, बदललेल्या भारताचा संदेश नक्कीच गेला आहे की कायद्यापुढे कोणी श्रीमंत, गरीब, नेता, अभिनेता नाही, सर्व समान आहेत. आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब,नेता,अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करुन युवकांना ड्रग्स पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करावे, असंही राम कदम म्हणाले.
प्रश्न उद्भवतो की ज्याप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार आणि इतर मंत्री पत्रकार चर्चा करून एनसीबीवर सतत टीका करत आहेत. ज्या प्रकारे एनसीबी अधिकाऱ्यांची बदनामी करत आहे आणि त्यांचा अपमान करत आहे. त्यांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण सरकार ड्रग माफियांच्या पाठीशी उभे आहे. ड्रग माफिया आणि महाराष्ट्र सरकार यांचा काय संबंध आहे हे सांगत राम कदम यांनी एक व्हिडिओ जारी केला. महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांना ड्रग माफियांकडूनही वसुली मिळत आहे का? कदाचित याच कारणामुळे ते ड्रग माफियांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, अशी टीकाही राम कदमांनी केली आहे.