शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

दिवस आठवणीतले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 2:41 AM

आमच्या आय एल एस लॉ कॉलेजात इतके खुशीचे वातावरण असे की, एखाद्याला पॅडोराज बॉक्स उघडण्यापूर्वी जग कसे असावे, याची कल्पना येईल. मी तर जेवण आणि झोप सोडली तर वर्गात, टेकडीवर किंवा हॉटेलमध्ये मित्रांसमवेत सतत असे. रात्र प्रहर बदलत असताना रेडिओवर गाणी ऐकत मित्रांसमवेत बसण्यात खूपच मजा असे.

- अ‍ॅड. नितीन देशपांडेप्रत्येक वकिलाचे, तसेच न्यायाधीशाचे मूळ विधि महाविद्यालयात आहे. या सर्वांना त्या वेळी तीन आणि आता तीन किंवा पाच वर्षे आनंदाने तेथे काढणे अपरिहार्य असते. निदान पुण्याच्या आय एल एस लॉ कॉलेजमधील आनंददायी दिवस कोणीच विसरू शकत नाही.टेकडीच्या पायथ्याशी असलेला कॉलेजचा विस्तीर्ण परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. खरंतर त्यातील दिवस संपू नये म्हणून एखाद्याला नापासच व्हावे वाटावे; पण कायद्याच्या परीक्षेत पैज लावूनसुद्धा नापास होणे त्या वेळी अवघड होते. राष्टÑपिता महात्माजींनी पण आपल्या बॅरिस्टरीच्या परीक्षेविषयी हेच म्हटले आहे.कॉलेज सुरू झाल्यावर मी माझा मित्र संजीव गोरवाडकरकडे सहज गेलो होतो. त्याचे वडील त्या वेळी पुण्यात न्यायाधीश होते त्यांनी विचारले, ‘‘कॉलेजमध्ये समोरची मिसळ खातो की नाही?’’ मी भीत भीत थाप मारली - ‘‘नाही’’. ते म्हणाले, ‘‘अरे, मग तुम्हाला कायदा कसा कळणार’’. सरन्यायधीश चंद्रचूड पण कॉलेजमध्ये आल्यानंतर या चवदार मिसळीचा उल्लेख विद्यार्थ्यांशी संवाद साधताना करत असत. आमच्या कॉलेजात इतके खुशीचे वातावरण असे की, एखाद्याला पॅडोराज बॉक्स उघडण्यापूर्वी जग कसे असावे, याची कल्पना येईल. मी जर जेवण आणि झोप सोडली तर वर्गात, टेकडीवर किंवा हॉटेलमध्ये मित्रांसमवेत असे. रात्र प्रहर बदलत असताना रेडिओवर गाणी ऐकत मित्रांसमवेत बसण्यात खूपच मजा असे.त्या वेळचे प्रिंसिपल डॉ. साठे हे विद्वत्ता, शीघ्रकोप, प्रेमळपणा आणि समाजवादी विचार असे संमिश्रण होते. ते जुरिस्प्रुडन्स शिकवत. त्यांचा आवडता विद्यार्थी असल्याने मी सिली मिडॉफ किंवा सिली मिडॉन म्हणजे पहिल्या बाकावर बसत असे. त्यामुळे डुलकी घ्यायची चोरी; पण पेंगुळलेले वातावरण ओळखून ते आम्हाला बाहेर काढून मागच्या वृक्षराजीत एका झाडाच्या पारावर ते आमचा तास घेत. त्या वेळी पक्षीपण छान गुंजराव करत. नाहीतर हायकोर्टातला तमाम पक्षिवर्ग कॉरिडॉरमध्ये जरा गप्पा रंगल्या की ‘टप’कलेच.या सुखी काळात अपवाद तो कंटाळवाण्या परीक्षेच्या काळाचा. नुकताच मी भर दुपारी कॉलेजात गेलो होतो. क्रिकेट मैदानावरून उष्ण झुळूक आली ती बरोबर धुरळा घेऊन. मी भूतकाळात गेलो...सकाळच्या गारव्यात उठायचा कंटाळा. वाटले जरा आवरू, ताजेतवाने होऊ, म्हणजे जे बसायचे ते संध्याकाळपर्यंत. आवरले; पण पेपरमध्ये नेमके आकर्षक मथळे... मी स्वत:ला समजावले, परीक्षा आली म्हणून काय झालं? सामान्यज्ञान हवेच. पेपर वाचले, मी ठरवले चला आता मात्र बसायचेच; पण उकाडा. जरा पडावेसे वाटले; पण डोळा काही लागेना.मनात विचार आला, काय आहे घरात? मोह फार. जरा कॉलेजच्या लायब्ररीत जातो. काय आहे त्या वातावरणात होईल अभ्यास! उन्हातून गेलो. जरा पाणी प्यावे, कुठेतरी झाडाखाली गारवा घेऊ. मूडपण येईल, कसले काय, बसलो एकदाचा. वर पंखा गर्मी वाढवत होता. पुढ्यात जुरिस्प्रुडन्ससारखा विषय. एक नजर आजूबाजूला. प्रत्येक जण आळोखे पिळोखे देत होता. गरम वारे मैदानावरून खिडकीतून लायब्ररीत येत होते. मैदानात आंबटशौकीन क्रिकेटचा सामना खेळत होते. मी पण जांभया दिल्या. टिचक्या वाजवल्या. वातावरणाशी समरस झालो. आजूबाजूस मुली मात्र फक्त पुस्तकाकडे नजर खिळवून. बरं जमतं. दुपारचे अडीच वाजले. खर सांगू का? उठायला कारणच शोधत होतो; पण काय आहे सिरियसली अभ्यास करायलाच हवा होता.झाले. कोपºयातून एक मित्र उठला. म्हणाला, ‘‘चल चहाला? खरंतर उठायला नको; पण पुढे पॅ्रक्टीस करायची आहे, वकील बंधूशी बरं पाहिजे, चला’’. ‘‘अरे माझा मूड लागलाय रे. फक्त मोजून दहा मिनिटं हं’’. मग कॅन्टीनमध्ये मित्र म्हणतो. ‘‘अरे, या अभ्यासांचा आणि प्रॅक्टीसचा कायपण संबंध नाय. कसला तुझा मूड, मार गोली. गप्पाच गप्पा. इतक्या की लायब्ररी बंद होऊन पुस्तक, वही आत अडकते काय. घरी आलो. मस्त टी. व्ही. आहे. महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे. उद्या पाहू; पण पुढच्या वर्षी मात्र जुलैपासूनच लागायचं, म्हणजे असं होणार नाही.’’ एवढं तासन्तास एकाग्रचित्ताने अभ्यासपूर्ण युक्तिवाद करणारे वकील व अभ्यासपूर्ण असंख्य निकाल देणारे न्यायाधीश परीक्षेच्या अभ्यासाला सारखेच कंटाळायचे.(लेखक हायकोर्टात वकील आहेत) 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीnewsबातम्या