शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:04 PM2020-01-22T17:04:33+5:302020-01-22T17:06:52+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या विधानावर ठाम .राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता.
Next
पुणे : 2014 ला शिवसेनेने काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता या माझ्या विधानावर मी ठाम असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपल्या विधानाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले,मी स्पष्ट विधान केलं होतं. मी माझ्या विधानावर ठाम आहे. 2014 ला चार ही पक्ष वेगवेगळे लढले. भाजपने अल्पमतातला सरकार स्थापन केले तेव्हा शिवसेना विरोधात बसली होती.
चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. अर्थव्यवस्थेबाबतच्या अनेक बैठकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बोलावले जात नसल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच जर सीतारामन यांचे काम समाधानकारक नसेल तर त्यांना पदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.तसेच सध्या देशात मंदी असून येत्या बजेट मध्ये ठोस आर्थिक धोरणे न राबविल्यास मंदी कायम राहील असेही ते यावेळी म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे स्पष्टीकरण