पुणे : 2014 ला शिवसेनेने काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता या माझ्या विधानावर मी ठाम असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपल्या विधानाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले,मी स्पष्ट विधान केलं होतं. मी माझ्या विधानावर ठाम आहे. 2014 ला चार ही पक्ष वेगवेगळे लढले. भाजपने अल्पमतातला सरकार स्थापन केले तेव्हा शिवसेना विरोधात बसली होती.
शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 5:04 PM