"मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 06:48 PM2024-08-28T18:48:35+5:302024-08-28T18:48:57+5:30

Harshvardhan Patil indapur vidhan sabha: हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी राजकीय भाष्य करतानाच एक जुना किस्साही सांगितला.

"I suspended 84 MLAs"; Harshvardhan Patal told 'that' story | "मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

"मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

Harshvardhan Patil News: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते हर्षवर्धन पाटील पुन्हा दुसऱ्या पक्षात उडी मारणार अशा चर्चा आहेत. हर्षवर्धन पाटील त्याबद्दल सूचक संकेत देताना दिसत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत इंदापूर निवडणुकीबद्दल भाष्य केले. त्याचबरोबर ८४ आमदारांच्या निलंबनाचा एक किस्साही सांगितला. 

हर्षवर्धन पाटील यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी अजित पवारांसोबतचे राजकीय वैर आणि अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक आल्यानंतरच्या आठवणी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्या.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "राजकारण हे समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असतो. मला असे वाटते की लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. तो आपला सगळ्याच पक्षांशी असतो. राहिलाच पाहिजे. जेव्हा राजकीय मते व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाची आपली भूमिका ठरलेली असते."

'माझ्यावर अन्याय झाला की, इंदापूरची जनता...'

"माझ्यावर त्यावेळी अन्याय झाला. ज्या-ज्या वेळी माझ्यावर अन्याय होतो, त्यावेळी माझ्या तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते, हा मला अभिमान आहे. मला वयाच्या ३१ व्या वर्षी इंदापूरच्या जनतेने आमदार केले. आमदारकीची शपथ घेण्याअगोदर मला राज्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा योग आला", अशी आठवण हर्षवर्धन पाटलांनी सांगितली.   

"मी त्या काळातील सर्वात तरुण मंत्री होतो. सलग चार वेळा म्हणजे १७-१८ वर्षे. पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मला खूप शिकता आले. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख... या सगळ्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर अतिशय सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध मी प्रस्थापित केले. मी राजकारणात कायम अॅसेट म्हणून काम केले", असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

हर्षवर्धन पाटलांना का म्हणायचे निलंबन मंत्री?

"मला असे वाटते की तो काळ राजकारणाचा सुवर्णकाळ होता. धोरणात्मक निर्णय व्हायचे. मी संसदीय कार्यमंत्री होतो. मला तर निलंबन मंत्री म्हणायचे. मी सभागृहात एन्ट्री केली की, म्हणायचे आले, निलंबन मंत्री. मी ८४ आमदारांना निलंबित केलेले १० वर्षाच्या काळात. त्यावेळी कटुपणा घ्यावा लागायचा. वाईटपणा घ्यावा लागायचा. आता मी ज्या पक्षात आहे, त्यातील काही लोकांना निलंबित करावे लागले", असा किस्सा हर्षवर्धन पाटील यांनी सांगितला.

Web Title: "I suspended 84 MLAs"; Harshvardhan Patal told 'that' story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.