पिंपरी : राज्य सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय स्वागतार्ह आहे. राज्याच्या तिजोरीचा विचार करून शक्य आहे, ते देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला तर वाटते, अजित पवारांनीमुख्यमंत्री व्हावे. मात्र मला वाटून काय होणार. पक्षाचे सर्व निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतात. त्यांचा निर्णय माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांना मान्य असणार आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राला शनिवारी भेट दिली. कोल्हे यांनी यावेळी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.ते म्हणाले, पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनात काय चुका केल्या आहेत, काय अडचणी आहेत आदींबाबत पाहणी करणार आहोत, असे सांगत असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यावेळी पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही शहराला दररोज पाणीपुरवठा केला जात होता. आता मात्र पाणीकपात का होत आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.