शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पवारांच्या मनातील मला कळते, पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाहीय; जयंत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 5:06 PM

सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, चंद्रहार पाटलांना तिकीट कसे मिळाले, यामागचे राजकारण सांगितले.

जास्त काळ शरद पवारांसोबत राहिल्याने त्यांच्या मनातील मला कळते, असा दावा करतानाच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नसल्याचे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांनी सांगलीच्या लोकसभेच्या राजकारणावरही भाष्य केले. 

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने महाराष्ट्र व्हिजन-२०५० या विषयावर पाटील बोलत होते. शरद पवारांची भूमिका कायम त्यागाची राहिली आहे. आमच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुतारी हातात घेण्यासाठी लोकांच्या भावना आहेत. मुख्यमंत्री कोण होईल या पेक्षा आता असलेले सरकार घालविणे जास्त महत्वाचे आहे. भारतीय जनता पार्टी सुतकात आहे. मूळ भाजपवाले बाजुला राहिले आणि बाकीचे लोक पक्ष चालवत आहेत, अशी टीका पाटलांनी केली. आरक्षणावर सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, आमचा पाठिंबा असेल. भाजपची लोकप्रियता कमी झालेली आहे. त्यामुळे ते अजित पवारांना वेगळे लढावे, मग एकत्र येऊ असे सांगतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. 

सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरेंनी परस्पर तिकीट देणे हे मीच मुद्दामहून घडवून आणले असे वाटत असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा लढवायची अशी ठाकरेंची इच्छा होती. काँग्रेसचे हातकणंगले शेट्टीना द्यायचे चालले होते. त्यामुळे ठाकरेंना जागा नव्हती, यातून त्यांनी अचानक जागा जाहीर केली, असे पाटील म्हणाले. उलट मलाच चंद्रहार पाटील म्हणाले होते, की त्यांना हे तिकीट कसे काय मिळाले, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. 

पक्ष कसा चालला पाहिजे याचा माझ्या एवढा अनुभव कोणाला नाही. माझे दिवस मोजणाऱ्यांना पण माहित आहे, मी किती दिवस आहे. अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नाहीय. उरलेले दोघे सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले आहेत. आम्ही राजकारणी लोक मत कशी पडतील हे पाहतो. पण जनतेने थोडीशी जबाबदारी घ्यावी, तात्पुरता विचार कोण करतेय. आणि महाराष्ट्राच्या हिताचा कोण विचार करतेय हे जनतेलाच समजून घ्यावे लागेल, असेही पाटील यांनी सांगितले. 

राजकीय नेत्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. निवडणूक आयोगात आता कणा राहिला नाही. राजकारणात विश्वासघाताचे प्रमाण वाढले आहे. या गोष्टीतून महाराष्ट्राला बाहेर काढले पाहिजे. समाज्याने तात्पुरत्या मिशनवर असणाऱ्या लोकांना घरी घालवावे, असे आवाहनही पाटील यांनी केले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस