शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 3:18 PM

नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला होता. त्यासोबत काही पदाधिकारीही होते. मात्र त्यातीलच एक पदाधिकारी आज शरद पवार गटात पुन्हा परतला आहे.

ठाणे - काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवारांना मोठा धक्का दिला होता. त्यात शरद पवारांच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत NCP विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस किरण शिखरे यांचाही अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. मात्र आता या पक्षप्रवेशावरून राष्ट्रवादीत हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. माझ्यावर दबाव टाकून माझा पक्षात प्रवेश करून घेतला असा दावा किरण शिखरे यांनी केला आहे.

ठाणे येथे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत उपस्थित किरण शिखरे यांनी म्हटलं की,  मला जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून कोकण विभाग अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस जबाबदारी  देण्यात आली होती. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनी शरद पवारांसोबत निष्ठेने राहावं असं मला वाटत होतं. त्यासाठी मी जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्याकडे त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. मी स्वत: त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र मी ओबेरॉय हॉटेलला भेटायला गेल्यावर मला तिथे पक्षप्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. तेव्हा मी जिथे आहे तिथे निष्ठेने राहीन, माझ्यावर दबाव टाकू नका असं मी म्हटलं. पण त्या गोष्टी न ऐकता पक्षप्रवेशासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी कुठेही गेलो नाही. मी २४ तासांत पुन्हा माझ्या साहेबांकडे आलो आहे. मला अतिशय टॉर्चर केले गेले असा आरोप शिखरेंनी लावला. 

तसेच मी कालपासून मी घरी गेलो नाही. घरापर्यंत माणसं पाठवली जातायेत. मला आव्हाडांकडून जो चुकून प्रकार घडला त्याचा निषेध करायला सांगितले. तू एससीचा आहे असं म्हटलं गेले. पण मी छातीठोकपणे सांगतो, माझ्याकडे जातीने पाहिले नाही. मला पक्षप्रवेश करण्यासाठी तुला विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवतो. जे हवं ते देतो असं सांगितले. परंतु मी कुठल्याही पदासाठी प्रलोभनासाठी गेलो नाही. वेळोवेळी आम्ही शरद पवारांच्या माध्यमातून काम केले. सुप्रिया सुळेंवर आज ते टिका करतायेत. पण एप्रिल महिन्यापासून सोनिया दुहन यांनी प्रचार बंद केला होता. भाजपाविरोधात कुठलेही ट्विट टाकलं नव्हते असंही किरण शिखरे यांनी सांगितले. 

दरम्यान, शरद पवारांनी या लोकांना भरभरून दिले. त्यांना सन्मान राखला गेला पण हे लोक सोडून दिले. परंतु मी माझ्या पक्षाशी, शरद पवारांशी प्रामाणिक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. मी जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात काम करून इथपर्यंत आलो आहे. मरेपर्यंत मी जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांसाठी काम करत राहणार आहे. मी माझ्या घरी जाऊ शकत नाही इतका माझ्यावर दबाव आहे. आज मी हे बोलल्यानंतर कुठल्या गुन्ह्यात मला लटकवलं जाईल हे माहिती नाही. परंतु मला मारून टाकलं तरी पक्ष सोडणार नाही. मी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहे. जे काही प्रकार घडले ते दबावातून घडले. मी मुंबईतून कल्याणला पळून आलो, त्यानंतर आज ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना भेटायला आलोय असा दावाही किरण शिखरे यांनी केला.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे