Maharashtra Government: 'मी राष्ट्रवादीतच होतो अन् कायम राष्ट्रवादीतच राहीन, पवारसाहेबच आमचे नेते'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 05:18 PM2019-11-24T17:18:50+5:302019-11-24T17:24:27+5:30
Maharashtra Government: अजित पवार यांनी दुसरं धक्कादायक ट्विट केलंय. त्यामध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे.
मुंबई - राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं ट्विट केलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत दिले आहेत. काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज ट्विटरवर सक्रीय झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या ट्विटचा सिलसिला सुरूच राहिला.
अजित पवार यांनी दुसरं धक्कादायक ट्विट केलंय. त्यामध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असेही अजित पवारांनी म्हटलंय. त्यासोबच भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असेही अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
Maharashtra Deputy CM, Ajit Pawar: I'm in NCP & shall always be in the NCP, and Sharad Pawar saheb is our leader. Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the state and its people. pic.twitter.com/QK3vkLBvPD
— ANI (@ANI) November 24, 2019
दरम्यान, शनिवारी सकाळी अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, काल दिवसभरात अजित पवार यांनी एकही ट्विट केलं नव्हतं. अखेर आज अजित पवार ट्विटरवर सक्रीय झाले. त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींचे आभार मानले. आम्ही राज्यात स्थिर सरकार देऊ आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी काम करू, असं आश्वासन अजित पवारांनी ट्विटमधून दिलं. त्यानंतर, आपण कायम राष्ट्रवादीतच राहणार असल्याचंही स्पष्ट केलंय.
I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.