मोदींनाही विचारेन ना, आधी ८० तर होऊदे; शरद पवारांवरील टीकेवरून अजित पवारांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:19 PM2024-01-18T15:19:54+5:302024-01-18T15:20:43+5:30
शरद पवारांना वय झाले त्यांनी बाजुला व्हावे, असे अनेकदा अजित पवार यांनी म्हटले होते. यावरून नाना पटोले यांनी अजित पवारांनी मोदींना निवृत्त व्हा असे सांगावे, असे आव्हान दिले होते.
राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. शरद पवारांना वय झाले त्यांनी बाजुला व्हावे, असे अनेकदा अजित पवार यांनी म्हटले होते. यावरून नाना पटोले यांनी अजित पवारांनी मोदींना निवृत्त व्हा असे सांगावे, असे आव्हान दिले होते. यावर अजित पवारांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर आता पंतप्रधान मोदींना निवृत्त व्हा, असे त्यांनी बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.
यावर अजित पवार यांनी नानांचे आव्हान स्वीकारले आहे. मोदांना वय विचारेन ना, परंतु आधी ८०चे तर होऊदे, असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच नानाना सांगा मला शिकवू नका, तुम्ही किती पक्ष फिरून आलाय ते पहा, अशी टीकाही अजित पवारांनी केली.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरदेखील अजित पवारांनी भाष्य केले आहे. सरकार सरकारचे काम करत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जो निर्णय घेता येईल तो निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री जरी दावोसमध्ये असले तरी त्यांचे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आमच्याशी बोलणे होत असते, असेही पवार म्हणाले.