शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

एकाच घरात दोन मंत्रिपदं? रोहित पवारदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 1:21 PM

पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार मंत्रिपदासाठी इच्छुक

कर्जत-जामखेड: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला जवळपास महिनात होत आला तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. मंत्रिपदी कोणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास सोनं करू, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही, हा निर्णय पक्षाचा आहे. मात्र संधी मिळाल्यास सोनं करू, असं रोहित पवार यांनी म्हटलं. माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे रोहित पवारांनादेखील मंत्रिपदं दिल्यास एकाच घरात दोन मंत्रिपदं जाऊ शकतात.रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामांसाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी मतदारसंघातल्या विविध समस्यांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी काही प्रश्नांची उत्तर दिली. मंत्रिपदाची अप्रत्यक्ष इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिली तर सोनं करेन, अशी इच्छा बोलून दाखवली. ‘काम करणाऱ्यांना संधी मिळायला हवी, अशी लोकांची इच्छा असते. बोलणारे बोलतच असतात. मी कसलीही अपेक्षा न ठेवता काम करत आहे. मंत्रिपदासारखी जबाबदारी आल्यास ती स्वीकारावी लागेल,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं.अहमदनगर जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही रोहित पवार यांनी दिली. ‘आपल्याला आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. मात्र पक्ष वैयक्तिक आवडींवर चालत नाही. पक्ष चालवताना अनेक घटकांचा आणि समीकरणांचा विचार केला जातो. पण मला संधी मिळाल्यास तिचं सोनं करेन,’ असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे