शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

पुढील वर्षीही माझ्याच हस्ते विठ्ठलाची महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 5:59 AM

मुख्यमंत्री फडणवीस यांचा आत्मविश्वास

पंढरपूर : राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, बळीराजा दुष्काळातून मुक्त व्हावा आणि जनतेच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करण्याची ताकद राज्य सरकारला मिळावी, अशी मागणी आपण पांडुरंगाकडे केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजेनंतर पत्रकारांना सांगितले. पण त्याचवेळी पुढच्या वर्षी महापूजेलाही आपणच येऊ, असा आत्मविश्वासही व्यक्त केला.

आषाढी एकादशीनिमित्त पहाटे २़३० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली़ मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा लातूर जिल्ह्यातील विठ्ठल मारुती चव्हाण (वय ६१) व त्यांच्या पत्नी प्रयाग विठ्ठल चव्हाण (वय ५५, रा़ सांगवी, सुनेगाव तांडा, ता़ अहमदपूर) यांना मिळाला़ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभराचा मोफत पास व १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला़

मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शेतकरी आणि वारकरी संप्रदायातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. 

उद्धव मुख्यमंत्री झालेतर आनंदच : नीलम गोºहेमुख्यमंत्रिपद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल, असे सूचक वक्तव्य विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोºहे यांनी सोलापुरात केले. त्या म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र बसून घेतील; पण उद्धवजी मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल.स्वच्छ दिंडीचे मानकरीमंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा स्वच्छ दिंडीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील मारुतीबुवा कराडकर दिंडीला १ लाख रुपये व मानचिन्ह, दुसºया क्रमांकाचा पुरस्कार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सद्गुरूम्हातारबाबा पाथरुडकर दिंडीला ७५ हजार रुपये रोख व मानचिन्ह तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला ५० हजार रुपये व मानचिन्ह अशा स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे