शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

ईडीही आवळणार इक्बाल कासकरभोवती फास! मनी लॉण्ड्रीगबाबत चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 8:00 PM

खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. अवैध संपत्ती, मालमत्तेचे अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे.

 मुंबई, दि. २६ - खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ  इक्बाल कासकर पुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. अवैध संपत्ती, मालमत्तेचे अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. याबाबत त्याच्यासह त्याच्या सहका-यावर येत्या काही दिवसामध्ये ‘मॅनी लॉण्ड्रीग’बाबत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी इकबाल कासकर गेल्या आठवड्याभरापासून ठाण्याच्या खंडणीविरोधी पोलिसांच्या ताब्यात आहे. या गुन्ह्यातील धागेदो-याबरोबरच त्याचे भाऊ दाऊद,अनिस इब्राहिम यांच्याबाबत इंत्यभूत माहिती मिळविण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे आयबीच्या अधिका-यांकडूनही चौकशी केली जात आहे.  इक्बालचे गेल्या काही काळापासून दाऊदशी पटत नसलेतरी त्याच्या जीवावरच त्याची बिल्डर, उद्योजकांकडून हप्ता वसूली सुरु आहे.त्यातून त्याने करोडोची माया उकळली असून अनेक उद्योगामध्ये पैसे गुंतविल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ईडीनेही त्याकडे लक्ष केंद्रीत केले असून इकबालकडील आता पर्यतच्या तपासाबाबच्या माहितीसाठी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला आहे.  इक्बाल,तसेच इसरार सय्यद, मुमताज शेख व अन्य सहकाºयांनी खंडणीतून मिळविलेल्या पैसा अन्य उद्योगात भागीदारीमध्ये गुंतविल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यासह संबंधित उद्योजक, व्यापाºयांच्याकडे चौकशी केली जाणार असून त्यातील तथ्यानुसार  इक्बाल व संबंधितांवर ‘मनी लॉण्ड्रीग’बाबतचा गुन्हा दाखल केला जाईल, त्यांच्या बेहिशेबी ,अवैध संपत्ती, गुंतवणूकीबाबतची पाळेमुळे शोधली जाणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.झाकीर नाईकशी ‘कनेक्शन’?वादग्रस्त मुस्लिम विचारवंत झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फौडेशन (आयआरएफ) ला डी गॅगकडून देणग्या देण्यात आल्या आहेत का, याबाबतही तपास केला जात आहे. तपास अधिका-यांनी या घटनेचा इन्कार केला असलातरी त्यादृष्टिने इकबालकडे त्याची पडताळणी केली जात असल्याचे अतिवरिष्ठ अधिका-यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबई