शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

'साईबाबा संस्थानच्या सीईओपदी आयएएस अधिकारी नेमा'

By admin | Published: February 17, 2017 10:12 PM

आयएएस अधिकाऱ्यांची 15 मार्च 2017पूर्वी नेमणूक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 17 - श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून आयएएस अधिकाऱ्यांची 15 मार्च 2017पूर्वी नेमणूक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम करताना सर्वोच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. महाराष्ट्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता मुख्य न्यायमूर्ती जे. एस. केहर आणि न्या. एन.व्ही. रामन्ना, न्या. डी. वाय. चंद्रचूड व न्या. संजय कौल यांनी वरील महत्त्वपूर्ण निर्णय दिला.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल व न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने 2 मे 2014 रोजी राजेंद्र गोंदकर व संदीप कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या याचिकेत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी असा आदेश दिला होता. संस्थानतर्फे बांधण्यात येणारी भक्त निवासे, हॉस्पिटल, बगीचे व इतर सुविधांकरिता कार्यक्षम व अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे कसे गरजेचे आहे हे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आयएएस अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयएसए अधिकाऱ्यांची नेमणूक करणे अशक्य असल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला.15 मार्च 2017च्या पूर्वी आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक न केल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असे न्यायालयाने सूचित केले.