अकोला : भारतीय कृषी संशोधन परिषदेची (आयसीएआर) मूल्यमापन तज्ज्ञ समिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (पंदेकृवि) दाखल झाली असून, येथील संशोधन केंद्र, महाविद्यालयांचा आढावा समितीकडून घेतला जात आहे. या कृषी विद्यापीठातील संशोधन व शिक्षणाचा दर्जा बघून, येत्या २0२0 पर्यंत या कृषी विद्यापीठाला किती निधी उपलब्ध करायचा, याबाबत ही समिती आपला अहवाल ह्यआयसीएआरह्णला सादर करणार आहे. ह्यआयसीएआरह्णच्या अखत्यारित असलेल्या देशातील सर्व कृषी विद्यापीठांना, मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करू न दिल्या जातो. विविध नवे तंत्रज्ञान, नवे बियाणे संशोधनावर मोठय़ा प्रमाणात खर्च केला जातो. विद्यापीठामार्फत विविध कृषी विषयात पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यासाठी ह्यआयसीएआरह्णकडून विद्यापीठांना निधीची तजवीज करू न दिली जाते. यासंदर्भात प्रत्येक पाच वर्षांनी ह्यआयसीएआरह्णकडून मूल्यमापन केले जाते. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे यावर्षी मूल्यमापन केले जात असून, त्यासाठी गुजरातमधील दातीवाडा येथील सरदार कृषिनगर कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर.सी. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गठित पाच सदस्यीय समिती या कृषी विद्यापीठात दाखल झाली. या समितीमध्ये आचार्य एन.जी. रंगा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा कुलसचिव डॉ. टी.बी. सत्यनारायणा, उत्तराखंड येथील उद्यानविद्या व वनविद्याशास्त्र विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.सी.एम. शर्मा, उद्यानविद्या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कमलेश कंवर सोलन हिमाचल प्रदेश, धारवाड कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉ. आर.एस. गिरड्डी तसेच डॉ. त्रिपाठी या सदस्यांचा समावेश आहे. या समितीने बुधवारी डॉ.पदेंकृविचा आढावा घेतला आहे.
‘पंदेकृवि’चे ‘आयसीएआर’कडून मूल्यमापन!
By admin | Published: December 18, 2015 2:02 AM