शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

‘आयकॉन्स आॅफ पुणे (वुमेन)’ कॉफीटेबल बुकचे आज प्रकाशन

By admin | Published: March 19, 2016 1:53 AM

पुण्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ पुणे (वुमन)’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन उद्या (शनिवारी) ज्येष्ठ अभिनेत्री खासदार

पुणे : पुण्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ पुणे (वुमन)’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन उद्या (शनिवारी) ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजात आपले स्थान उंचावणाऱ्या महिलांच्या स्फूर्तिदायक यशोगाथेला अक्षर सलाम करणाऱ्या या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनाला खासदार वंदना चव्हाण, अमर साबळे, अनिल शिरोळे, संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्षा उषा काकडे, प्रख्यात लेखिका शोभा डे, अनिल काटे एंटरप्रायझेसचे संचालक अनिल काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील नारीशक्तीला ‘लोकमत’ने नेहमीच भरभक्कम पाठिंबा दिला आहे. महिलांच्या जीवनोन्मुखतेने त्यांच्या कर्तबगारीला नेहमीच वेगळा आयाम दिलेला आहे. याचेच प्रत्यंतर हे कॉफीटेबल बुक वाचताना येईल. राज्य पातळीवरील तेजस्विनींचा सन्मानदोन वर्षांपासून ‘लोकमत’ने ‘वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ सुरू केले आहेत. असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या तेजस्विनींचा जागर संपूर्ण राज्यभर व्हावा व त्यांच्या कार्यातून महिलांना उमेद मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे. ‘लोकमत’च्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशालिनींचा राज्य पातळीवरील ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कला, शौर्य, क्रीडा आणि उद्योग या क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.