राम देशपांडे/अकोला : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (आयडीबीआय) च्या खासगीकरणाच्या विरोधात बँकेच्या कर्मचार्यांनी अभिनव आंदोलन छेडले असून, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह सर्व राज्यातील मंत्री व खासदारांना पोस्टकार्ड पाठवून प्रस्तावित खासगीकरण थांबविण्याची विनंती वजा मागणी केली जात आहे. आयडीबीआय बँक भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असून, सर्वसाधारण क्रमावरील भारतातील चौथी मोठी बँक आहे. १९६४ पासून देशाच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या या बँकेचे खासगीकरण झाल्यास देशभरातील १८ हजारांहून अधिक कर्मचार्यांना नवृत्तिवेतन तथा शासनाच्या इतर विविध योजनांपासून वंचित राहावे लागेल. खासगीकरणाच्या दिशेने वाहत असलेले हे वारे रोखून धरण्यासाठी आयडीबीआयचे सर्व कर्मचारी सरसावले आहेत. प्रारंभी ह्यडेव्हलपमेंट फायनान्स इंस्टिट्यूटह्ण नावाने ओळखल्या जाणार्या या बँकेचे देशातील वाणिज्य क्षेत्रातील प्रभुत्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने बँकेच्या भागभांडवलात आपला हिस्सा ओतला. सप्टेंबर २00४ मध्ये आरबीआय अँक्ट १९३४ नुसार ह्यआयडीबीआयह्णला आरबीआयद्वारा संचालित केंद्रीय बँकेचा दर्जा मिळाला. ओघानेच आयडीबीआयमधील देशभरातील सर्व कर्मचार्यांना केंद्र शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे नवृत्तिवेतनासह इतर सुविधांचा लाभ मिळू लागला; मात्र केंद्र शासनाने २0१0 पासून वाणिज्य क्षेत्राशी निगडित सर्व बँक कर्मचार्यांचे पेंशन 'ऑफ' केले. बँकेच्या संचालकांनी स्वतंत्र निर्णय घेत हा नियम २00८ पासूनच बँकेला लागू केला. तद्नंतर देशात खासगीकरणाचे वारे वाहू लागले. सप्टेंबर २0१५ मोदी सरकारने ह्यआयडीबीआयह्णच्या ७५.४ टक्के भागभांडवलात अधिक दोन कोटी रुपये ओतून ते ८0 टक्केपर्यंत नेण्याचा नेण्याचा निर्णय घेतला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तो निर्णय फिरवत ह्यआयडीबीआयह्णचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हय़ातील अकोला, चोहोट्टा आणि आकोट येथे असलेल्या ह्यआयडीबीआयह्णच्या शाखांमधील कर्मचार्यांनीदेखील त्यास सर्मथन देत खासगीकरणास विरोध दर्शविणारे पोस्टकार्ड मंगळवारी पाठविले. इंडिया आयडीबीआय ऑफिसर्स असोसिएशन (एआयआयडीबीआयओअे), ऑल इंडिया बँक असोसिएशन (एआयबीए) तथा युनायटेड फायनांस बँक एम्प्लॉई असोसिएशन (यूएफबीईए) या संघटनांनी या अभिनव आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.
खासगीकरणाच्या विरोधात ‘आयडीबीआय’ कर्मचा-यांचे अभिनव आंदोलन!
By admin | Published: November 04, 2015 2:28 AM