औरंगाबाद : महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्वांत मोठ्या मोबाइल आॅपरेटर असलेल्या आयडिया सेल्युलरने १ हजार ग्राहक सेवा केंद्रे सुरू केली आहेत. अशा प्रकारे १ हजार केंद्रे सुरू करणारी आयडिया ही पहिलीच कंपनी ठरली आहे. परिणामी, त्यांना आता या विभागातील २ कोटी ग्राहकांना सेवा देणे शक्य होणार आहे. आयडियाने नवीन फॉरमॅट स्टोअर्स व सेवा केंद्र सुरू केली असून, त्या माध्यमातून ग्राहकांची वेगवान डेटा सेवांची गरज पूर्ण होणार आहे. सध्या आयडियाकडून महाराष्ट्र आणि गोव्यातील ५ हजार गावे आणि शहरांना ३-जी सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. महाराष्ट्र आणि गोव्याचे चिफ आॅपरेटिंग आॅफिसर राजेंद्र चौरसिया यांनी सांगितले की, कंपनीने सरासरी रोज १ स्टोअर्स हे कॅलेंडर वर्ष २०१५मध्ये सुरू केले आहे. विभागातील १ हजार शोरूम्सपैकी ३०० केंद्रे ही प्री-पेड व पोस्ट पेड ग्राहकांसाठी असून, त्यांना एकाच ठिकाणी सर्व आयडिया उत्पादने आणि सेवा उपलब्ध होणार आहेत.
आयडियाची महाराष्ट्र, गोव्यात एक हजार सेवा केंद्रे
By admin | Published: July 28, 2015 2:22 AM