नांदेड : आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे एमबीबीएस होण्याचे स्वप्न साकार करणाºया ‘आयडीयल इन्स्टिट्युट आॅफ बायोलॉजी’च्या (आयआयबी) विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रवेश यादीत मुसंडी मारली आहे. विविध नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांत आयडीयलचे तब्बल ४७९ विद्यार्थी प्रवेशपात्र झाले आहेत. ‘आयडीयल’ची संपूर्ण देशभरात ‘द किंगमेकर आॅफ एमबीबीएस’ अशी गौरवपूर्ण प्रतिमा निर्माण झाली आहे.राज्यातील शासकीय महाविद्यालयांत दरवर्षी २,५५६ विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश देण्यात येतो. यावर्षी ४७९ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रवेश यादीत स्थान मिळवत देशात आयडीयलचा लौकिक वाढवला आहे. त्यामध्ये तब्बल ९९ विद्यार्थी मुंबईचे तर पुणे २१, नागपूर २४ व औरंगाबादमधील ५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.जीएसएमसी शासकीय मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये आयडीयलचे १७ विद्यार्थी निवडले गेले. याशिवाय टिळक शासकीय मेडिकल कॉलेज, मुंबई २१ तर नायर शासकीय मडिकल कॉलेजमध्ये २४ विद्यार्थी प्रवेशपात्र झाले. कपूर शासकीय मेडिकल कॉलेज जुहू मुंबई येथे २१, आरजी शासकीय मेडिकल कॉलेज कळवा, ठाणे येथे २, पुणे येथील बीजेएमसी शासकीय मेडिकल कॉलेज २१, औरंगाबादच्या शासकीय मेडिकल कॉलेज ५५, नागपूर जीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज १५, सोलापूर शासकीय मेडिकल कॉलेज २७, लातूर जीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज ५९, जीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज अंबाजोगाई- ४९, सेवाग्राम शासकीय मेडिकल कॉलेज वर्धा-१५, वसंतराव नाईक शासकीय मेडिकल कॉलेज, यवतमाळ-११, आयजीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज, नागपूर-०९, जीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज, मिरज-२५, जीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज, कोल्हापूर-२२, जीजीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज, गोंदिया-५, जीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज, चंद्रपूर-९, जीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज, अकोला-७, बीएचआयआरई शासकीय मेडिकल कॉलेज, धुळे-१० तर जीएमसी शासकीय मेडिकल कॉलेज, नांदेड येथे ३८ विद्यार्थी एमबीबीएससाठी प्रवेशपात्र ठरले आहेत.भविष्यात आयआयबीच्या यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ७०० पर्यंत पोहोचेल असा विश्वास सूत्रांनी बोलून दाखविला. (वा.प्र.)
‘आयडीयल’चे ४७९ विद्यार्थी मेडिकल प्रवेशास पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 4:01 AM