शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

कर्नाळा अभयारण्यात ओळखपत्र सक्तीचे

By admin | Published: February 03, 2016 3:34 AM

पनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांना यापुढे ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले आहे. सध्या सहा सीसीटीव्हींद्वारे वन अधिकाऱ्यांकडून नजर ठेवली जाते

जितेंद्र कालेकर,  ठाणेपनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांना यापुढे ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले आहे. सध्या सहा सीसीटीव्हींद्वारे वन अधिकाऱ्यांकडून नजर ठेवली जाते. यात वाढ करून २० सीसीटीव्हींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. ‘इसिस’च्या कथित अतिरेक्यांनी या भागाची ‘रेकी’ केल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.कर्नाळा ओसाड आणि निर्मनुष्य परिसर असल्यामुळे या भागात ‘इसिस’चा प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा बेत होता. मुदब्बीर शेखचा साथीदार रिझवानच्या चौकशीत ही बाब उघड झाल्यानंतर इथल्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. गेल्या दोन दिवसांत मुंबई एटीएस आणि पनवेल ग्रामीण पोलिसांनी वन अधिकाऱ्यांची चौकशी केली. इथली रेकी होईपर्यंत वन कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना याची माहिती कशी मिळाली नाही? अशी विचारणा झाल्यानंतर एखादी व्यक्ती येथे आल्यानंतर तो कोण आहे हे कसे ताडणार? असा सवाल अधिकाऱ्यांनी केला. गेल्या महिनाभर या ठिकाणी सीसीटीव्ही लावल्याचे वन अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या सूचनेनंतर या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाल्यानंतर आणखी तीन लाख रुपये खर्च करून १५ ते २० सीसीटीव्ही लावण्यात येतील. एटीएसचे अधिकारी झाले प्रवचनकार१ठाणे : ‘इसिस’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेकलेल्या जाळ््यात भारतामधील तरुणांनी सापडू नये, याकरिता मौलाना आणि इमामांच्या मदतीने मस्जिद, मदरसा,शाळा, तसेच महाविद्यालयातून तकरीब अर्थात प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करण्याचा उपक्रम एटीएस ने सुरू केला आहे.२इसिससारख्या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यासाठी अनेक प्रकारची प्रलोभने दिली जातात. कोणत्याही प्रलोभनांना शालेय विद्यार्थी आणि तरुणांनी बळी न पडता, खऱ्या इस्लाम धर्माची ओळख करून देण्याकरिता एटीएसने पुढाकार घेतला आहे. ३भिवंडीत १४७ मस्जिदमधील मौेलानांची आणि २० मदरशांमधील इमामांची भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मौलानांच्या माध्यमातून तरुणांना विश्वासात घेण्यात आले. गेले तीन महिने हा उपक्रम सुरू असल्याचे दाभाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ४ इंटरनेट हाताळताना काय काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले जात आहे. पोलिसांच्या फेसबुक अकाउंटवरून तरुण तरुणींशी संपर्क साधून, त्यांनी कोणाला ‘लाइक’ आणि ‘अनलाइक’ केले याबाबतही मार्गदर्शन केले आहे. ५ इसिसकडून दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना कसे प्रवृत्त केले जाते, त्यापासून कोणते धोके आहेत, या पूर्वी दहशतवादी कारवायांत सहभाग घेतलेल्यांना त्यांचे कोणते परिणाम भोगावे लागले, याबाबतही मार्गदर्शन मिळते.