शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

भगवान वृषभदेवांच्या मूर्तीची गिनीज बुकात नोंद

By admin | Published: March 07, 2016 3:48 AM

बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील पहाडावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट उंच विशालकाय मूर्तीची जैन तीर्थक्षेत्रात जगात सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून

नितीन बोरसे ,  सटाणाबागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील पहाडावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट उंच विशालकाय मूर्तीची जैन तीर्थक्षेत्रात जगात सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये रविवारी नोंद करण्यात आली. ११ फेब्रुवारीपासून सुरू असलेला भगवान वृषभदेव मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचा रविवारी उत्साहात समारोप झाला. सोहळ्यातच ही शुभवार्ता गिनीज बुकच्या टीमने दिली.मांगीतुंगी पहाडावर २००२पासून १० वर्षे अखंड पाषाणाचा शोध सुरू होता. २०१२मध्ये अखंड पाषाण सापडल्यानंतर त्याच्यावर मूर्ती कोरण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. तब्बल ३५० मूर्तिकारांनी चार वर्षे मूर्तीवर काम केले. रविवारी सायंकाळी चंदनामतीमाता यांच्या हस्ते सर्वतोभद्र महालावरील मंडलिक ध्वजाचे अवतरण करून या महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या टीमने दिवसभर पहाडावरील भगवान वृषभदेव मूर्तीचे निरीक्षण करून मोजमाप केले. शिरापासून तळपायापर्यंत १०८ फूट उंचीची ही मूर्ती आहे. त्याचा टीमने अभ्यास करून सायंकाळी झालेल्या अखिल भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समितीच्या अधिवेशनात गिनीज बुकचे संचालक स्वप्निल डांगरीकर यांनी मूर्तीच्या विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले. डांगरीकर यांनी ज्ञानमतीमाता, पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, चंदनामतीमाता, आचार्य अनेकांतसागर महाराज, महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल यांना भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट उंचीच्या विशालकाय मूर्तीची गिनीज बुकात नोंद झाल्याचे प्रशस्तिपत्र सुपुर्द केले. मूर्ती तयार करण्यासाठी लागलेला कालावधी, अवघड ठिकाणी केलेले खोदकाम, अखंड पाषाणात कोरलेली मूर्ती आणि तिची उंची याचा निकष नोंद करताना लावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नोंदीमुळे मांगीतुंगी जैन तीर्थक्षेत्राचे नाव आता जगाच्या नकाशावर कोरले जाणार असून, जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून हे स्थान नावारूपाला येणार आहे. अखिल भारतीय जैन तीर्थक्षेत्र समितीच्या अध्यक्ष सरिता जैन, राज्याध्यक्ष प्रमोद कासलीवाल, डी. ए. पाटील, अभियंता सी. आर. पाटील, माजी अध्यक्ष आर. के. जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष नीलम अजमेरा, राष्ट्रीय महामंत्री संतोष पेंढारी, संजय पापडीवाल आदी या वेळी उपस्थित होते.