अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई (जि. बीड)शहरात बाराखांबी (संकलेश्वर) मंदिर परिसरात झालेल्या खोदकामात अनेक दुर्मीळ मूर्ती आढळल्या. मात्र, या सापडलेल्या मूर्तींचे जतन करायचे कसे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ११व्या शतकातील चालुक्यकालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या संकलेश्वर बाराखांबी मंदिराच्या परिसराचे खोदकाम येथील काही शिवप्रेमी मंडळींनी केले होते. या खोदकामात जवळपास ५० ते ६० मूर्ती सापडल्या असून त्यातील काही भग्न अवस्थेत तर, काही सुस्थितीत होत्या. विशेष म्हणजे, पुरातत्व विभागाची पूर्वपरवानगी न घेता खोदकाम केल्याने मूर्तींचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या पथकाने २६ जानेवारी रोजी पाहणी केली होती.पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहायक संचालक अजित खंदारे यांच्या नेतृत्वाखालील सहा जणांच्या पथकाने संकलेश्वर मंदिराच्या परिसराची पुरातत्व विभागाच्या निकषानुसार पाहणी केली. मात्र, या मूर्तींच्या संरक्षणाची कसलीही व्यवस्था न करता ते निघून गेले, तसेच या अधिकाऱ्यांनी संबंधित लोकांना अद्यापपर्यंत साधी नोटीसही बजावण्याची तसदी घेतलेली नाही.
अंबाजोगाईत खोदकामात सापडलेल्या मूर्ती असुरक्षित
By admin | Published: February 06, 2017 2:19 AM