ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - शिवसेना-भाजपाची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्षाला आता सुरुवात झाली आहे. आज भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी 25 वर्ष युतीत शिवसेना सडल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. 1995 ला युतीची सत्ता का आणि कशामुळे आली होती, याचा विचार त्यांनी करायला हवा होता.'युती करायची की नाही हा स्थानिक पातळीवरील नेत्यांचा प्रश्न आहे. एकवेळ बाळासाहेबांना आम्ही आमचा नेता मानत होतो. शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती. विनाकारण शिवसेना-भाजपामध्ये कटुता निर्माण व्हायला नको. महाराष्ट्रातील भाजपाचे नेतृत्व खंबीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे चांगले काम करत आहेत. मुंबई महापालिकेसह इतर ठिकाणी भाजपाला यश मिळेल', असा दावाही गडकरी यांनी यावेळी केला.
युती तोडायचीच होती तर... - नितीन गडकरी
By admin | Published: January 27, 2017 6:37 PM