शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...; अयोध्या दौऱ्यावर मनसेचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:37 AM

Raj Thackareay Ayodhya Tour: अयोध्याच्या जमिनीवर राज ठाकरेंना घुसू देणार नाही, असे आव्हान बृजभूषण यांनी दिल्याने इकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यावर भाजपाचे तेथील खासदार बृजभूषण सिंह यांनी आघाडी उघडली आहे. राज ठाकरेंना बृजभूषण यांनी विरोध केला आहे. अयोध्याच्या जमिनीवर त्यांना घुसू देणार नाही, असे आव्हान बृजभूषण यांनी दिल्याने इकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. 

यावर मनसे नेत्यांनी लालबागमध्ये बॅनर लावले असून राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा जसजसा जवळ येईल तसतसे राज्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. 

कांचनगिरींचं थेट नरेंद्र मोदींना पत्रराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावं अन्यथा संत, नागासाधू यांचा सामना करावा लागेल, असं थेट पत्र कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. राजकीय लढाई करायची असेल तर जरूर करा, पण देवदर्शनासाठी जर कुणाला अडवत असाल तर याद राखा. सर्व साधू संतांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा आहे असं गुरु माँ कांचनगिरी यांनी सांगितले. 

बृजभूषण सिंह यांनी स्वत:कडे पाहावं. ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत. त्यांनी इतरांना शिकवू नये. राजकीय पब्लिसिटीसाठी ते चमकोगिरी करत आहेत. बृजभूषण यांनी त्यांचा इतिहास बाहेर काढण्यासारखी वेळ आणू नये. तुम्हाला उत्तर प्रदेशातील नागरिकांची दया असती तर कंपनी, फॅक्टरी लावून यूपीतील लोकांना सक्षम बनवलं असतं. राज ठाकरे ५ तारखेला येतील कोण अडवतं ते पाहूच असा इशारा त्यांनी दिला.

बृजभूषण सिंह यांचा इशारा काय...''मी म्हणतो की राज ठाकरे उंदीर आहे. ते बिळात राहातात. त्या बिळातून बाहेर येत नाहीत. आत्तापर्यंत ते बाहेर आले नाहीत. पहिल्यांदाच ते हा दौरा करणार आहेत. त्यामुळे मी विरोध करत आहे. मी ठरवलं आहे की ५ तारखेला त्यांना उत्तर प्रदेशच्या धरतीवर घुसू देणार नाही. मी म्हटलंय म्हणजे घुसू देणारच नाही,'' अशा शब्दात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना इशारा दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्याMNSमनसेBJPभाजपा