मुंबई - पक्षाची सत्ता आली, तरच तुमच्यातील एखादा मुख्यमंत्री बनू शकतो, काहींना मंत्रिपद, नेतेपद लाभू शकते. खुर्ची नाहीच मिळाली, तरी किमान काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तरी राहाल. त्यामुळे हात जोडतो, एक व्हा, मतभेद टाळा. जुन्या गोष्टी विसरून काँग्रेसला विजयी करण्यास एकदिलाने काम करा. दिल्लीतील विजय महाराष्ट्रातील एकजुटीतून मिळेल, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी नेत्यांना एकीचा मंत्र दिला. महाराष्ट्राचे प्रभारी पद स्वीकारल्यानंतर खर्गे प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले. सकाळी त्यांनी प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन पुढील रणनीतीची चर्चा केली.देशातील लोकशाहीच संकटात सापडली आहे. देशाला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणायचे आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील कामगिरीवरच दिल्लीतील सत्तेचे भवितव्य अवलंबून आहे. केंद्रात सत्ता आणायची असेल, तर महाराष्ट्र राखावाच लागेल. त्यासाठी पक्षातील सर्व नेत्यांनी अंतर्गत वाद बाजूला सारून एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. - खा. मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी‘प्रोजेक्ट शक्ती’ने जनसहभागपक्षाचे धोरण, निर्णयप्रक्रियेत तळागाळातील कार्यकर्त्यांचाही समावेशव्हावा, यासाठी काँग्रेसने ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानाची राज्यात सुरुवात केली. ८८२८८४३०१० क्रमांकावर मतदार ओळखपत्रावरील क्रमांक एसएमएसद्वारे पाठविल्यास संबंधिताची नोंदणी होईल. त्यातून कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रोज पाच नोंदणीकृत कार्यकर्त्यांशी स्थानिक विषयांवर फोनद्वारे संवाद साधणार आहेत.संविधानाचे रक्षण केले म्हणून चहावाला पंतप्रधानसायंकाळी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यभरातील पदाधिकाºयांना संबोधित केले. खर्गे म्हणाले, शेतकरी आत्महत्या, दलितांवरील वाढते अत्याचार, बिघडलेली अर्थव्यवस्था आदी मुद्द्यांवरून खर्गेयांनी मोदींवर टीकेची झोड उठविली. हरित क्रांतीपासून अंतराळातील यशाचापाया काँग्रेसने रचला आहे. काँग्रेसनेच देशातील लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण केले, म्हणूनच आज एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकला. गिरणी कामगाराचा मुलगा लोकसभेतील विरोधी पक्षांचा नेता आहे, असा टोलाहीखर्गे यांनी हाणला.
महाराष्ट्रात एकजूट झाल्यास कॉँग्रेसला केंद्रात सत्ता - खर्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 6:34 AM