अहमदनगर: माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. रविवारी संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली. यावेळी भिडे यांनी म्हटले की, माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले.
भविष्यात तलवार हातात घ्यावीच लागेल- संभाजी भिडेतत्पूर्वी रायगड येथे ३२ मण सुवर्णसिंहासनाची पुनर्स्थापना आणि खडा पहारा तुकडी निर्मितीच्या प्रचार-प्रसारासाठी नाशिकमध्ये रविवारी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतही भिडे यांची काही विधाने लक्ष वेधून घेणारी ठरली होती. रायगडावरील सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय चालू आहे, म्हणून टीका करतील. त्यामुळे तुर्तास याठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.
पाकिस्तान नव्हे तर सुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका- संभाजी भिडे