शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

शिस्त मोडाल, तर सगळे पुन्हा बंद करावे लागेल; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 5:38 AM

शिक्षण, आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण तुम्ही जर शिस्त मोडाल, रस्त्यावर गर्दी करुन गोंधळ घालाल तर पुन्हा सगळंच बंद करण्याची वेळ येईल. तुम्ही ते करणार नाही, असा मला विश्वास आहे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री जनतेला संबोधित करताना केले. येत्या रविवार म्हणजे ७ जूनपासून वर्तमानपत्र घरोघरी वाटप करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.जे सुरू करू ते पुन्हा बंद करायचे नाही या जाणिवेतून करू. शिक्षण आणि आरोग्य हे या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. तुम्ही खबरदारी घ्या; मी जबाबदारी घेतो असे सांगताना आता दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. जे सुरू करू ते पुन्हा बंद करायचे नाही, या जाणिवेतून करू असेही ठाकरे यांनी ठासून सांगितले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या मुलांना तातडीने परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टर की सरासरी काढून गुण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांनी परीक्षा घेण्याचा धरलेला आग्रह खोडून काढला आहे.अनेक लोक शेवटच्या क्षणी रुग्णालयात धाव घेतात, आणि उपचार करण्याच्या आत त्यांचा दुदैर्वी मृत्यू होतो. हा आजार अंगावर काढण्यासारखा नाही. थोडा जरी ताप असला किंवा लक्षण असले तरी तातडीने डॉक्टरला दाखवा. खासगी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासन करेल, लॅबची संख्या वाढवली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.मी जे बोललो त्याचा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना राग आला पण त्यांनी त्या रागातून का होईना रेल्वे दिल्या. त्यामुळे बारा लाख लोक परराज्यात जाऊ शकले. एसटी महामंडळाने पाच लाख लोकांना राज्याबाहेर नेऊन सोडले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.रुग्णांचा ६५ हजार आकडा दिशाभूल करणाराराज्यात २९ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून फक्त ३४ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २४ हजार रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत. आज महाराष्ट्रात फक्त दोनशे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. १२०० रुग्ण गंभीर आहेत, मात्र बाकी सगळे रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी ६५ हजार हा आकडा दिशाभूल करणारा आहे, पण मोजण्याची ती पद्धत असल्यामुळे तो आकडा येतो असे सांगितले. अशा आकड्यांचा आधार घेऊन महाराष्ट्रातील आपलेच लोक आयुष्यभर महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असेही त्यांनी भाजपचे नाव न घेता सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या