मुंबई : मराठी भाषा हा विषय सक्तीचा व्हावा, यासाठी सरकार आग्रही आहे. मराठी भाषा विषय सक्तीचा न करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर आता दंड ठोठावला जाणार आहे. तसेच हा दंड थोडा थोडका नव्हे, तर 1 लाख रुपयांच्या जवळपास असणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठी विषय सक्तीचा न करणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या इंग्रजी शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात येणार असून, त्यात ही तरतूद करण्यात आली आहे.आज मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेत राज्यांतील सर्व शाळेत मराठीच्या अध्यापनाची सक्ती करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं.
शाळांमध्ये आता मराठी विषय न शिकवल्यास होणार एक लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 6:42 PM
मराठी विषय सक्तीचा न करणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे मराठी भाषा विषय सक्तीचा न करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर आता दंड ठोठावला जाणार आहे.राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आलं आहे.इंग्रजी शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात येणार असून, त्यात ही तरतूद करण्यात आली आहे.