शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

तर महाविद्यालयांवर आर्थिक ताण?

By admin | Published: September 15, 2016 3:39 AM

खासगी विनाअनुदानित वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के जागा राज्यातील विद्यार्थ्यांनाच द्याव्यात, या राज्य सरकारच्या अटीमुळे खासगी विनाअनुदानित

मुंबई : खासगी विनाअनुदानित वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के जागा राज्यातील विद्यार्थ्यांनाच द्याव्यात, या राज्य सरकारच्या अटीमुळे खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांवर आर्थिक भार पडेल का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी संबंधित महाविद्यालयांकडे केली. खोळंबलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत उच्च न्यायालय शुक्रवारी किंवा सोमवारी निर्णय देणे अपेक्षित आहे.राज्यातून दहावी व बारावी करणाऱ्या, त्याशिवाय अधिवासाचे प्रमाणपत्र असणाऱ्याच परराज्यातील विद्यार्थ्यांना राज्याच्या ८५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तसेच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रियाही केंद्रीभूत करण्याचेही शासनाने ठरविले आहे. राज्य सरकारच्या या दोन्ही निर्णयांना परराज्यांतील विद्यार्थी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे बुधवारी होती. राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याने हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारच्यावतीने महाअधिवक्ता रोहित देव यांनी या वेळी न्यायालयाला सांगितले.‘आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यात सहजासहजी प्रवेश मिळत नाही. त्यांची फरफट थांबावी, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. देव यांनी खंडपीठापुढे केला.राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याने परराज्यातील विद्यार्थी येथेच स्थायिक होण्याची भीतीही राज्य सरकारने या वेळी व्यक्त केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या याआधी अशाच प्रकारच्या याचिकांवर दिलेल्या निर्णयानुसार, परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी किमान १५ टक्के राष्ट्रीय कोटा ठेवणे आवश्यक आहे आणि तशी तरतूद सरकारने केली असल्याचेही अ‍ॅड. देव यांनी निदर्शनास आणून दिले.‘खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना अशा प्रकारची अट घालू शकत नाही. घटनात्मक आरक्षणांचीही सक्ती खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांवर केली जाऊ शकत नाही. मग सरकारची ही अट योग्य कशी?’ असा प्रश्न केला.या याचिकांवरील युक्तिवाद अद्याप पूर्ण न झाल्याने यावरील पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)