मी पुस्तक लिहिले तर, महाराष्ट्रात खळबळ उडेल, त्यांची सावली होतो; प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 02:23 PM2023-07-05T14:23:46+5:302023-07-05T14:24:37+5:30
प्रफुल्ल या मंचावर कशासाठी, त्यांच्या मंचावर का नाही याचे उत्तर देशच नाही तर महाराष्ट्र शोधत आहे. प्रफुल्ल पटेल सौम्य बोलतो. कमी बोललेलेच चांगले आहे... प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा
२०२२ ला महाविकास आघाडीची सत्ता जेव्हा जात होती, तेव्हा शिंदे सुरत, गुवाहाटी, गोवा करत फिरत होते. तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार, विधान परिषद सदस्य शरद पवारांना भेटले होते. आपण भाजपासोबत सत्तेत जाऊ अशी विनंती करत होते. अजित पवारांनी पहाटे शपथविधी केला याचे वारंवार बोलले जाते. अजित पवारांनी पक्षाच्या, कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतला आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल या मंचावर कशासाठी, त्यांच्या मंचावर का नाही याचे उत्तर देशच नाही तर महाराष्ट्र शोधत आहे. प्रफुल्ल पटेल सौम्य बोलतो. कमी बोललेलेच चांगले असते. मी पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. जेव्हा हा प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहिल तेव्हा महाराष्ट्राला धक्का बसेल, काय काय समजेल हे मला सांगण्याची गरज नाही. प्रफुल्ल पटेल म्हणजे त्यांची सावली होती, नेहमी त्यांच्यासोबत असायचो. कधी विरोधात पाहिलेय का? अजूनही वेळ गेलेली नाहीय. मी जाहीरपणे हात जोडून पाय जोडून विनंती करतो आमची पण भावना समजून घ्या. तुमच्या आशिर्वादाने आम्ही सगळे याच दिशेने काम करू, असे इशारावजा आवाहन पटेल यांनी शरद पवारांना केले आहे.
कोणी म्हणते वैचारिक मतभेद. ज्या दिवशी महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना कोणासोबत होती, भाजपासोबत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना सर्वाधिक शिव्या दिल्या असतील त्या बाळासाहेबांनी दिल्या. मग भाजपासोबत गेलो तर काय वाईट. काश्मीरच्या मेहबुबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला हे भाजपासोबत जाऊ शकतात. स्टॅलिन एनडीएचे भागीदार होते. मी विरोधकांच्या त्या मिटिंगमध्ये गेलो होते. ते चित्र जेव्हा मी पाहिले तेव्हा मला हसू येत होते. एका पक्षाचे खासदार शून्य होते. त्या १७ पक्षांसोबत जाऊन काय होणार आहे. आम्ही पक्षाच्या, मतदारसंघांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे, असे पटेल म्हणाले.
अजित पवारांना काय गरज होती. ते विरोधी पक्षनेते होते. त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आपण त्यांना शेवटपर्यंत साथ देऊ, त्यांचे काही चुकत असेल तर त्यांना सांगू महाराष्ट्राच्या हितामध्ये हे बसणार नाही, असे पटेल म्हणाले.