शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

दुर्लक्ष केले तर पडू शकतो उमेदवार, या गटात ‘ती’ची पॉवर! ज्येष्ठ महिलाच ठरविणार आमदार

By नितीन चौधरी | Published: October 20, 2024 1:29 PM

७० ते १२० वयोगटातील मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त

नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: महिला या पुरुषांपेक्षा जास्त जगतात हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे. याचाच प्रत्यय मतदारांच्या आकडेवारीतूनही स्पष्ट होत असून, राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीत ७० ते १२० पेक्षा अधिक वय असलेल्या गटातील पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या या वयोगटात राज्यात  ७८ लाख ७६ हजार मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या तब्बल ३ लाख ४१ हजारांनी जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठ महिलाच आमदार ठरविण्यात आघाडीवर राहणार हे उघड आहे. 

राज्यातील मतदार 

  • एकूण    ९,६३,६९,४१० 
  • पुरुष     ४,९७,४०,३०२
  • महिला     ४,६६,२३,७७
  • तृतीयपंथी     ६,०३१

या वयोगटात महिला मतदार पुरुषांच्या पुढे

वयोगट     पुरुष     महिला     तृतीयपंथी     एकूण     फरक७०-७९    २६,३२,६९१    २७,१२,४२७    ६२    ५३,४५,१८०    ७९,७३६८०-८९    ९,१५,८९२    ११,१८,५०६    १३    २०,३४,४११    २,०२,६१४९०-९९    १,९७,७६२    २,५१,२२१    ०    ४,४८,९८३    ५३,४५९१००-१०९    २१,१४१    २६,३५८    २    ४७,५०१    ५,२१७११०-११९    ५१    ५९    ०    ११०    ८१२०            ५४    ५४    ०    १०८    ०एकूण     ३७,६७,५९१    ४१,०८,६२५    ७७    ७८,७६,२९३    ३,४१,०३४

महिलांचे प्रमाण अधिक असलेल्या या आकडेवारीला एका सर्वेक्षणाचा देखील आधार आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक डेटा अँड ॲनालिसिसच्या सर्वेक्षणानुसार २०१४ ते १८ या दरम्यान देशातील महिलांचे सरासरी आयुर्मान पुरुषांपेक्षा चार टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून आले आहे. उदाहरणार्थ एखादा पुरुष ६८ वर्षे २ महिने जगत असल्यास महिला ७० वर्षे ७ महिने जगत असल्याचे दिसून आले आहे.

काेणत्या वयाेगटात जास्त?

- राज्याच्या मतदारांच्या आकडेवारीनुसार ७० ते ७९ या वयोगटात पुरुषांपेक्षा ७९ हजार ७३६ महिला मतदार जास्त आहे. तर ८० ते ८९ या वयोगटात महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा तब्बल २ लाख २ हजार ६१४ इतके जास्त आहे. - ८९ ते ९९ या वयोगटातही ५३ हजार ४५९ महिला पुरुषांपेक्षा जास्त असून शंभरी पार केलेल्या ज्येष्ठांमध्येदेखील महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा ५ हजार २१७ने जास्त आहे. - ११० ते ११९ या वयोगटातही ८ महिला पुरुषांपेक्षा जास्त आहे. १२० पेक्षा अधिक वयोगटात मात्र, पुरुष व महिलांचे प्रमाण सारखेच असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४