'सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफीसाठी आयोग नेमणार, अग्निवीर योजनेची समीक्षा करणार', काँग्रेसचं मोठं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 06:22 PM2024-03-13T18:22:10+5:302024-03-13T18:22:40+5:30

Congress Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे, या योजनेचीही समिक्षा केली जाईल, असे जयराम रमेश यांनी सांगितले

'If it comes to power, it will appoint a commission for farmer loan waiver, review Agniveer Yojana', Congress promises | 'सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफीसाठी आयोग नेमणार, अग्निवीर योजनेची समीक्षा करणार', काँग्रेसचं मोठं आश्वासन

'सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफीसाठी आयोग नेमणार, अग्निवीर योजनेची समीक्षा करणार', काँग्रेसचं मोठं आश्वासन

धुळे -  भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्या आहेत. पाच गॅरंटीमधून काँग्रेसचा हा २० कलमी कार्यक्रम असून ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे. राजकीय शब्दकोषात गॅरंटी हा शब्द वापरणारा देशातील पहिली व्यक्ती राहुल गांधी आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारावेळी त्यांनी पाच गॅरंटी जाहीर केल्या होत्या त्यानंतर तेलंगणातही अशाच गॅरंटी जाहीर केली होत्या आता या गॅरंटींची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यावेळी या गॅरंटी शब्दावर भाजपाने टीका केली होती परंतु आज दररोज मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी यावरच त्यांना भर द्यावा लागत आहे, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला आहे. तसेच काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे, या योजनेचीही समिक्षा केली जाईल, असेही जयराम रमेश यांनी सांगितले. 

धुळे येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयराम रमेश म्हणाले की, महिला न्याय गॅरंटी ची घोषणा ही ऐतिहासिक व क्रांतीकारी आहे. मोदींनी १० वर्षात दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केलेली नाही. देशातील काही मुठभर लोकांना मोदी सरकारने १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले नाही. युपीए सरकारने मात्र शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे काँग्रेस सत्तेवर आल्यास या योजनेचीही समिक्षा केली जाईल.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सावित्रिबाई फुलेंच्या जन्मभूमी व कर्मभूमीत महिला सक्षमिकरणाची महिला न्याय गॅरंटी दिली ही खऱ्या अर्थाने सावित्रिबाईंचा गौरव आहे, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला ताकद देणारा आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज संस्थात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांचा भागिदारी वाढलेली दिसत आहे. महिला सक्षमिकरणात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. भाजपा सारखा चुनावी जुमला अथवा मोदी गॅरंटी सारखी खोटी नाही, काँग्रेसची गॅरंटी ही पक्की व वॉरंटी सुद्धा आहे. महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्याबद्दल प्रदेश  कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. 
 

Web Title: 'If it comes to power, it will appoint a commission for farmer loan waiver, review Agniveer Yojana', Congress promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.