बेळगाव - राज्याच्या राजकारणात सध्या भावी मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार समोर येत आहे. अजित पवार यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान केले. त्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकावले. त्यानंतर नागपूरात देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री होणार असे पोस्टर्स लागले. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले असतील ते ज्याने लावलेत त्याने काढून टाकावे. असा मूर्खपणा भाजपाच्या कुणी करू नये. कुणी अतिउत्साही लोकांनी लावला असेल. बातमीसाठी लोक असे प्रकार करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. २०२४ ला शिंदेच मुख्यमंत्री असतील. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढू आणि जिंकून दाखवू असं त्यांनी सांगितले.
प्रकल्पातील विरोधामुळे महाराष्ट्राचे अतोनात नुकसानबारसू येथे विरोध करणाऱ्यांची संख्या कमी आहे. संख्या कमी असली तरी त्यांचा आम्ही सन्मान करतो, स्थानिक भूमिपूत्रांची भूमिका समजून घेऊ. राजकीय विरोध आम्ही सहन करणार नाही. रिलायन्स रिफायनरी गुजरातमध्ये आहे. तिथे कुठेही नैसर्गित नुकसान झाले नाही. महाराष्ट्रात रिफायनरी उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार येईल. मुंबईतून येऊन काही लोक विरोध करतात. हा विरोध बंद झाला पाहिजे. या महाराष्ट्राचा अतोनात नुकसान विरोध करणाऱ्यांमुळे होतोय. कोणाची सुपारी घेऊन तुम्ही विरोध करताय? महाराष्ट्रात हा प्रकल्प झाला नाही तर इतर राज्यात जाईल. सरकारच्या ३ कंपन्या मिळून एकत्रित हा प्रकल्प उभारतायेत. १००-२०० लोक होते. त्यांना ताब्यात घेते. कुठल्याही गोष्टीला विरोध करायचा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
कर्नाटकात भाजपाला मिळेल बहुमतकर्नाटकात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळाले. देशात लोकांनी मोदींना स्वीकारले आहे. मुख्यमंत्री मोदींसोबत काम करणारे असतील तर विकास वेगाने होतो, योजना मार्गी लागतात हे लोकांना माहिती आहे. जर दुसऱ्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आले तर त्यांनी प्रकल्प रोखले आहेत, योजना रोखल्या आहेत. डबल इंजिन सरकारचे काम लोकांनी बघितलेय. त्यामुळे भाजपाला बहुमताने लोक निवडून देतील. आमचा एक्झिट पोल लोकांच्या मनातील असतो. बोम्मई यांच्या नेतृत्वात सरकार पुन्हा निवडून येईल. एक्झिट पोलचे आकडे आम्ही खोटे ठरवले आहेत असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.