्र्र्र...अन्यथा मत होईल बादसोलापूर: महापालिका निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (ईव्हीएम) चार गटांतील सर्व उमेदवारांची नावे व चिन्हांचा समावेश असून, त्यासमोरील चार बटन न दाबणाऱ्यांचे मत बाद होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. यावेळेस प्रथमच महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे मतदान करताना चार गटातील बटन दाबले नाही तर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी काळम-पाटील यांनी स्पष्ट केले. प्रत्येक केंद्रावर उमेदवारांची संख्या पाहून मशीनची रचना करण्यात येणार आहे. एका मशीनवर १५ ते १८ नावे बसतात. प्रत्येक गटातील उमेदवारांच्या पत्रिकेला विशिष्ट रंग दिला आहे. अ गटातील उमेदवारांची नावे संपल्यावर एक बटन रिकामे असेल. त्यानंतर ब गटातील उमेदवारांची यादी असेल. एका गटातील बटन एकदाच दाबता येईल. एकदा हे बटन दाबले गेले तर पुन्हा दाबता येणार नाही. एक बटन दाबले गेल्यावर अन्य बटन आपोआप लॉक होणार आहेत. मतदारांना एखाद्या गटातील उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास सर्वात शेवटी नोटाचे बटन आहे. कोणतेच बटन न दाबल्यास नोटाचे बटन दाबावे लागेल. प्रत्येक गटातील एक याप्रमाणे प्रत्येक मतदाराला चार बटन दाबणे बंधनकारक असेल. चौथे बटन दाबल्यावर बीप आवाज होऊन मशीन आपोआप लॉक होईल व मतदान झाले असे समजावे. एका ईव्हीएम मशीनवर १५ बटन असतील. एखाद्या गटात सातच उमेदवार असतील तर आठवे बटन हे नोटाचे व नववे बटन लॉक असेल. त्यापुढे १० व्या बटनापासून दुसरा गट सुरू होणार आहे. त्यामुळे एका मशीनवर एका पक्षाचे चिन्ह दोन वेळा येऊ शकते. या पद्धतीवर अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम मशीन असावे, अशी त्यांची मागणी आहे. यामुळे उमेदवारांना क्रॉस व्होटिंगची भीती वाटत आहे. पण निवडणूक रिंगणातील ६२३ उमेदवार व प्रत्येक प्रभागात असलेली चुरस यावरून ईव्हीएम मशीनची संख्या वाढविणे अशक्य आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानेच कमीत कमी मशीनमध्ये उमेदवारांची रचना करावी, अशा सूचना केल्यामुळे अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या प्रभागात चारही गटातील उमेदवार संख्या कमी असल्यास तीन ईव्हीएम मशीनमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो, असे मुख्य निवडणूक अधिकारी काळम-पाटील यांनी स्पष्ट केले. -------------------चार गटांसाठी चार रंगअ गटासाठी पांढरा रंग, ब गटासाठी फिकट गुलाबी,क गटासाठी फिकट पिवळा ड गटासाठी फिकट निळा रंग -------------------मतदान केंद्रावर माहितीप्रत्येक मतदान केंद्रावर त्या प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती फ्लेक्सवर प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये उमेदवाराने उमेदवारी दाखल करताना प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीचा समावेश असेल. त्यात त्याची वैयक्तिक, कौटुंबिक, संपत्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख असेल.
्र्र्र...अन्यथा मत होईल बाद
By admin | Published: February 17, 2017 12:51 PM