यवतमाळ : शिक्षक दिनानिमित्त नरेंद्र मोदी सरांचा क्लास जिल्ह्यात हाऊसफुल्ल दिसत होता. सरांनी सांगितलेल्या युक्तीच्या चार गोष्टी विद्यार्थी कान लावून ऐकत होते. जिल्हाभरातील शाळांमध्ये सकाळपासून मोदी सरांच्या क्लासचीच उत्सुकता होती. अनेक ठिकाणी विजेने व्यत्यय आणला तरी शिक्षकांनी मात्र रेडिओवरून मोदी सरांचा आवाज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी दूरचित्रवाणी, रेडिओच्या माध्यमातून संवाद साधला. जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. वीज नसलेल्या शाळांनी तर चक्क गावातील प्रतिष्ठितांच्या घरी मुलांना नेऊन मोदी सरांचे भाषण ऐकविले. उमरखेड तालुक्यातील रतननाईक तांडा येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या घरी एकत्र येऊन मोदी सरांचा क्लास केला. तर नेर तालुक्यातील मांगलादेवी परिसरात वीज पुरवठा खंडित होता. परंतु शिक्षकांनी त्यावर तोडगा काढीत रेडिओवरून भाषण ऐकविले. पांढरकवडा तालुक्यातील सुकळी पोड येथे कोणत्याच सुविधा नसताना शिक्षकांनी विशेष परिश्रमाने विद्यार्थ्यांना रेडिओवरून पंतप्रधानांचे भाषण ऐकविले. कळंब येथील शाळांनी तर चिंतामणी मंदिर, राम मंदिराच्या सभागृहात व्यवस्था करून विद्यार्थ्यांना भाषण ऐकविले.
पाचपुते, गावित दोषी ठरले तर हकालपट्टी
By admin | Published: September 06, 2014 2:21 AM