लोकमत न्यूज नेटवर्कफलटण (जि.सातारा) : राज्य सरकार कर्जमाफीबाबत गोंधळलेले दिसते. सर्वप्रकारच्या शेतीसंबंधित कर्जाला माफी दिली नाही तर जनताच सरसकट धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी दिला. श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ शरद पवार यांना शुक्रवारी सायंकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, शेतीतील ज्यांना कळते त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत असतात; मात्र सत्तेवर असलेले भाजप सरकार सरकसट कर्जमाफीवरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांची कर्जे विविध प्रकारची असतात. काही तर बँकाबरोबरच पतसंस्थांकडूनही कर्ज घेतात. मात्र पतसंस्थांना कर्जमाफी दिलेली नाही.
तर जनताच सरसकट धक्का देईल - पवार
By admin | Published: July 08, 2017 3:48 AM