शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्षपदावर राहिल्यास विरोधकांचाच फायदा- शरद पवार

By admin | Published: May 11, 2017 9:02 PM

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे. रावसाहेब दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदावर असणे हे विरोधकांच्या फायद्याचे असल्याचं म्हणत पवारांनी दानवेंना टोला हाणला आहे. विरोधकांनी दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करू नये. दानवेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा विरोधी पक्षांनाच जास्त फायदा होईल, असे पवार म्हणाले आहेत. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही कानउघाडणी केली आहे. शिवसेना राज्यभरात दौरा करत असतानाच भाजपाही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आपण मात्र निवांत आहोत. गेली 15 वर्षं आपण सत्ता उपभोगली. सरकार जाऊन अडीच वर्षं झाली तरी सत्ताधा-यांसारखी मानसिकता अजून आपली गेली नाही. त्यामुळे सर्वात आधी मानसिकता बदला आणि कामाला लागा. सद्यस्थितीत रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. लोकांना विरोधकांकडून अपेक्षा आहेत. विरोधकांनी लोकांच्या अपेक्षांची पूर्ती केल्यास भविष्यात नक्कीच वेगळं चित्र दिसेल, असे पवार म्हणाले. 
तत्पूर्वी तूर खरेदीवरून शेतक-यांना साले म्हणून त्यांचा अपमान करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही, मन दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.