ठाणो : नुकत्याच झालेल्या स्वप्नाली लाड प्रकरणातील रिक्षाचालकाचा शोध सुरू असून ती जेव्हा शुद्धीवर येईल, तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल. परंतु, या प्रकरणात जर रिक्षाचालक खरोखर दोषी असेल तर ही बाब आमच्या व्यवसायावर डाग ठरणार आहे. या प्रकरणाचा आम्ही निषेध करत असून ‘तो’ रिक्षाचालक दोषी असल्यास त्याचे परमिट जप्त केले जाईल, अशी भूमिका ठाणो रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आली.
ठाणो रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकत्र्याची बैठक ठाण्यात पार पडली. या वेळी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, महासंघटक सुधाकर चव्हाण, सरचिटणीस भाई टिळवे यांच्यासह ठाणो, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड अशा 5 जिलंतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्यात अनेकदा भिवंडी, काही मुंबईचे रिक्षाचालकही येतात. यापैकी काहींना ठाण्यातील रस्तेही माहीत नसतात. त्यामुळे ते पॅसेंजरला दुस:या रस्त्यावरून नेतात. स्वपAालीच्या बाबतीत त्या दिवशी नेमके असे काही घडले की, खरोखरच रिक्षाचालकाची चूक होती, हे पडताळावे लागेल, अशी चर्चा महासंघाच्या बैठकीत झाली. त्यामुळे रिक्षाचालक सापडल्यावर आणि स्वपAाली शुद्धीवर आल्यानंतर सत्य जाणल्याशिवाय कोणताही निर्णय घेणो चुकीचे ठरेल, असे मत महासंघाच्या पदाधिका:यांनी व्यक्त केले. तसेच जर कोणी त्या रिक्षाचा क्रमांक नोंद केला असेल किंवा रिक्षाचालकाची माहिती असेल, अशांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
च्घोडबंदर तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर होणा:या खाजगी वाहतुकीमुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम होतो आहे. विशेषत: खाजगी बसेसमधून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
च्परंतु, येत्या 14 ऑगस्टपूर्वी ही खाजगी वाहतूक बंद करावी, अन्यथा 15 ऑगस्टपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा ठाणो रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाने या बैठकीतून दिला.
‘त्या’ रिक्षाचालकाच्या अटकेसाठी मनसे काढणार मोर्चा
1स्वप्नाली लाड प्रकरणी दोषी असलेल्या रिक्षाचालकाला तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा, पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. या प्रकरणात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, असे साकडे शिवसेनेच्या नगरसेविकांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांना घातले आहे.
2तत्पर बससेवा ठाणो परिवहन सेवेने न दिल्यानेच या तरुणीला भीतीपोटी रिक्षातून उडी मारावी लागली. मुठीत जीव घेऊन रिक्षा पकडणा:या या मुलीला वेळेवर बस उपलब्ध झाली असती तर रिक्षाचा आधार घेण्याची वेळच तिच्यावर आली नसती. कोलशेत-घोडबंदर रोडवरील टीएमटी बसेस वाढवण्यात याव्यात, ही अनेक वर्षाची प्रलंबित मागणी असल्याचे मनसेने म्हटले आहे.
3परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खासगी बसेस आणि रिक्षांचा मुक्तसंचार वाढला आहे. त्यामुळे या सेवा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भीतीदायक ठरला आहेत. त्या रिक्षाचालकाचा शोध न घेतल्यास मनसे या तरुणीला न्याय देण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
4रिक्षा आणि फेरीवाल्यांचा ठाणो परिसरात चाललेला धुडगूस अस होत आहे. न्यायालयाच्या निकालाचे फेरीवाला धोरण महापालिकेने धाब्यावर बसवले आहे. त्याची अंमलबजावणीही केली नाही. त्यामुळे रिक्षावाल्यांचा मुजोरीचाही बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
5दरम्यान, स्वप्नाली प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात तसेच निर्जनस्थळी महिला पोलिसांची गस्त वाढवावी.
6तसेच आरटीओ कार्यालयात रिक्षाचालक-मालकांची संपूर्ण माहिती ठेवावी, मद्यप्राशन करून रिक्षा चालवणा:यांचीही तपासणी व्हावी, त्यांच्या मनमानीविरोधात मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी युवती सेनेसह शिवसेनेच्या नगरसेविकांनी लक्ष्मीनारायण यांच्याकडे केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.