शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

रस्ता दुरुस्त न झाल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By admin | Published: June 08, 2016 2:44 AM

खानिवडे शाळेचा निकाल १०० टक्के लागला असला तरी उसगाव ते भाताणे भालीवली ते भिनार हे या भागातील मार्ग खराब झाले आहेत

वसई : वसई ग्रामीण भागात दहावीच्या शालांत परिक्षेत चांदीप, खानिवडे शाळेचा निकाल १०० टक्के लागला असला तरी उसगाव ते भाताणे भालीवली ते भिनार हे या भागातील मार्ग खराब झाले आहेत. त्यामुळे नवसई, भाताणे, आडणे, हत्तीपाडा, आंबुलपाडा येथील आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.उसगाव ते भाताणे हा मार्ग काही वर्षापासून तानसा नदीकाठाच्या बाजूने खचला आहे. या मार्गावरून सुरू असलेली एसटी सेवा ८ वर्षापासून बंद आहे जीव धोक्यात घालून फक्त रिक्षा चालक या मार्गावर प्रवासी वाहतूक करतात. या वर्षी खचलेला हा मार्ग सार्वजनिक बांधकामे विभागाने दुरूस्त केला नाही तर या मार्गावरील होणारी वाहतुकच ठप्प होणार आहे. त्याचप्रमाणे भालवली ते निंबवली हा मार्ग प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार होत असून भातणे ते भालीवली या गावादरम्यानच्या मार्गावर फक्त मातीच टाकली आहे. पाउस पडल्यास चिखल होऊन प्रवास करणे धोक्याचे होईल. त्यामुळे प्रशासनाने जागे होऊन शाळा सुरू होण्याआधी हे मार्ग प्रवाशांच्या दृष्टीने सुखकर करावेत, अशी मागणी आहे.