शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
3
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
4
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
5
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
6
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
7
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
8
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
9
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
10
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
11
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
12
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
13
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
14
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
15
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
16
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
17
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
18
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
19
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

"मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज", सत्तारांच्या विधानानं चर्चेला उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 9:18 PM

सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

औरंगाबाद-

सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सत्तारांनी रश्मी ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेण्याची ही पहिली वेळ नाही. हिवाळी अधिवेशावेळीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिच्या दुखण्याच्या त्रासामुळे ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नसतानाही सत्तार यांनी यासंदर्भातील विधान केलं होतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. 

"शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्यासाठी २५ वर्षांपासून राज्यात पूजा झाली आहे. २५ वर्ष मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहावेत अशी विनंतीही सर्वांनी केली आहे. सुप्रियाताई मुख्यमंत्री झाल्यास कधी होतील, कोणत्या परिस्थितीत होतील हे आज मी काही बोलणार नाही. त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई सज्ज आहेत. त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे. सुप्रियाताईंचा मुख्यमंत्रीपदासाठीचा नंबर २५ वर्षांनंतर लागावा ही ईश्वर, अल्लाहकडे प्रार्थना", असं अब्दुल सत्तार म्हणाले. 

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार का असे विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी "हे महाराष्ट्राची जनता ठरवेल; मी कसं ठरवणार?", अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील जनतेसोबत चर्चा केली. त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचं वक्तव्य केलं. 

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज्यात चांगला पाऊस पडू दे. बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकडं तुळजाभवानीकडे घातल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेना