शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

"10 सभा घ्या नाही तर 50 सभा घ्या, पण..."; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 11:33 AM

"आपण या आपण पंतप्रधान आहात. अजूनही आपल्याला वाटते आपण पंतप्रधान आहात, पण आपण आता पंतप्रधान नाही. कारण..."

देशात लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षणे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नव-नवे मुद्दे उपस्थित करून आपापल्या विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवत गंभीर आरोप केले आहेत. एवढेच नाही, तर मुंबई करांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

...नरेंद्र मोदी येथे येऊन काय बोलणार? -संजय म्हणाले, "आपण मुंबईत 10 सभा घ्या नाहीतर 50 सभा घ्या. पण मुंबईच्या जनतेने निश्चित केले आहे. यावेळी भाजप सर्वात आधी मुंबईतून तडीपार. देशात तर होणारच. मात्र आपण मुंबईवर ज्या पद्धतीने अन्याय केला आहे, मुंबई लुटण्याचा प्रयत्न केला आहे, मुंबई लुटून गुजरातला घेऊन जाण्याची, मुंबईतील मध्यमवर्गियांसोत जो छळ कपट केला आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी येथे येऊन काय बोलणार?"

मुंबई करांनी आपल्याला मते का द्यावीत? ज्या पद्धतीने आपण धारावी अदानींना विकली, ज्या पद्धतीने आपला धारावीसह मुंबईही अदानींना विकण्याचा कट आहे, असे आरोप करत, मुंबई करांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केला. "आपण या आपण पंतप्रधान आहात. अजूनही आपल्याला वाटते आपण पंतप्रधान आहात, पण आपण आता पंतप्रधान नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होते, तेव्हा आपण जास्तीत जास्त कार्यवाहक पंतप्रधान असतात. पण आपण त्याच पद्धतीने फिरत असाल आणि घोषणा करत असाल, लोकांना धमक्या देत असाल, तर हे चालणार नाही," असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४