शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

'पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल', सुमित्रा महाजन यांचे सूचक संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 10:35 AM

Sumitra Mahajan: पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल; पण आता वय झाले आहे. त्यातही नेशन आणि पार्टी फर्स्ट असल्याचे सूचक वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.

डोंबिवली : पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल; पण आता वय झाले आहे. त्यातही नेशन आणि पार्टी फर्स्ट असल्याचे सूचक वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. डोंबिवली  येथे आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान सोहळ्यात शुक्रवारी त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी त्या बाेलत हाेत्या.  आठ वेळा इंदूरच्या खासदार राहिलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा महाजन यांची पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी मुलाखत घेतली. त्या म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद यांनी भारत हा विश्वगुरू होणार हे सांगितले. आपल्या देशाची प्रगती सध्या याच पथावर आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका महत्त्वाची आहे.  ठामपणे निर्णय घेतले जात आहेत.  त्यामुळे भारताबद्दल आदर निर्माण झाल्याचे गौरवाेद्गार त्यांनी काढले. या मुलाखतीत नगरसेविका ते लोकसभा अध्यक्षपदाचा त्यांनी प्रवास उलगडला.

लोकसभा अध्यक्षामुळे जबाबदारी वाढलीपै फ्रेंडस् लायब्ररीच्या पुढाकाराने आणि कल्याण-डोंबिवली महापालिका, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान सोहळ्याच्या आठव्या दिवशी महाजन यांच्या भेटीचा अभूतपूर्व योग जुळून आला. लोकसभेचे अध्यक्षपद भूषवताना वेगवेगळ्या राज्यातील खासदारांबरोबर संवाद साधताना अडचण वाटली नसल्याचे महाजन यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यावर जबाबदारी वाढली. अशावेळी कशाप्रकारे अभ्यास केला याचाही अनुभव महाजन यांनी सांगितला. यावेळी त्यांनी इंदूरमधील अहिल्याबाई स्मारकाची माहितीही दिली. 

देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांचीही जबाबदारी  देशाची प्रगती साधण्याची जबाबदारी केवळ राजकीय नेत्यांची नाही, तर नागरिकांचीही आहे. आपण निवडून दिलेला नेता चुकीचे वागत असेल, तर मतदारांनी त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे.  आजकाल देवालाही वाटून घेतले जाते,  तसेच मोठ्या माणसांनाही वाटून घेतले जात आहे,  हा चुकीचा पायंडा आहे, असे त्या म्हणाल्या. 

मानपत्र केले प्रदान महाजन यांचा सत्कार पै फ्रेंडस् लायब्ररीतर्फे पुंडलिक पै यांनी केला. चित्रकार प्रभू कापसे यांनी काढलेले चित्र आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी लिहिलेले मानपत्र सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माधव जोशी, दर्शना सामंत, मधुकर चक्रदेव, दीपाली काळे, वृंदा भुस्कुटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनMaharashtraमहाराष्ट्र