शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मालमत्तेची नोंदणीच केलेली नाही, दस्त नोंदणी स्टँप पेपर रजिस्टर नसेल तर? 

By प्रगती पाटील | Updated: September 3, 2024 08:04 IST

मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारद्वारे मालमत्ता/मालमत्ता मालकीच्या विक्रीवर लादलेला कर आहे. भारतीय मुद्रांक कायदा, १८९९  च्या कलम ३ अंतर्गत हे देय आहे. राज्य किंवा मालमत्ता कुठे आहे आणि ते नवीन किंवा जुने घर आहे यावर आधारित देखील बदलते.

    - अनंत बोकडेमुद्रांक शुल्क हा राज्य सरकारद्वारे मालमत्ता/मालमत्ता मालकीच्या विक्रीवर लादलेला कर आहे. भारतीय मुद्रांक कायदा, १८९९  च्या कलम ३ अंतर्गत हे देय आहे. राज्य किंवा मालमत्ता कुठे आहे आणि ते नवीन किंवा जुने घर आहे यावर आधारित देखील बदलते. वस्तूंच्या देवाण-घेवाणीच्या बाबतीत खरेदीदार आणि विक्रेता दोघेही समान रीतीने मुद्रांक शुल्क भरण्यास जबाबदार असतात.मालमत्ता नोंदणीची कागदपत्रे कायदेशीर पुरावा मानली जात नाहीत. अनेक ग्राहकांनी मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे कारण ज्यादा मुद्रांक शुल्क हे देखील एक कारण आहे. जर तुम्ही नोंदणी केली नसेल आणि तुम्ही भविष्यात मालमत्ता विकण्याचा विचार करत असाल तर त्यात अडचणी येऊ शकतात. अनेकजण मालमत्तेची नोंदणी करत नाहीत, कारण मुद्रांक शुल्काचे दर खूप जास्त आहेत, ते आम्हाला परवडत नाहीत असे त्यांचे म्हणणे असते; पण मालमत्तेची नोंदणी करणे केव्हाही फायदेशीर असते. नाहीतर भविष्यात आपली ही मालमत्ताच अडचणीत येऊ शकते.स्टँप पेपर खरेदी केल्यापासून सहा महिन्याच्या आत त्याचा वापर करावा लागतो. अन्यथा त्यानंतर तो कोणत्याही कायदेशीर कामासाठी वापरता येत नाही. स्टँप पेपरवर केलेल्या कराराबाबत त्या करारामध्ये उल्लेख केलेला जो कालावधी असेल तेवढी त्याची मुदत असते आणि तेवढा काळ तो करार वैध असतो. कराराचा कालावधी नमूद केलेला नसेल तर तो पुढे रद्द करण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये समझौता हा एकच पर्याय राहतो.मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्क भरावे हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. ही कागदपत्रे आपण मालमत्तेचे खरे मालक आहोत याचा पुरावा आहे. ग्राहकांना एक-वेळ नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क भरावे लागते. ग्राहकाने हे शुल्क भरले नाही, तर त्याला दरमहा थकीत रकमेच्या दोन टक्के दंडासह थकबाकीची रक्कम भरावी लागेल. हा दंड मूळ रकमेच्या २०० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे नोंदणी करणे केव्हाही चांगले. - प्रगती जाधव-पाटील उपसंपादक, लोकमत, सातारासरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र