मुंबई : उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी आम्ही तिघांनी ठरवले तर महाराष्ट्रात हाेईल काही तरी, ते वेगळे सांगण्याची गरज नाही, असे वक्तव्य करत आम्ही तिघे एकत्र आलो तर महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकते, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळातर्फे प्रकाशित सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पवार म्हणाले की, राज्य सरकारशी बोलणे सध्या आम्हाला अडचणीचे आहे. पण त्यातून कधीतरी मार्ग निघेल. ठाकरे, थोरात आहेत आणि मी सुद्धा आहे. आम्ही तिघांनी ठरवले तर कदाचित होईल काही तरी महाराष्ट्रात, वेगळे सांगण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.
...तर या वैभवाचा उपयोग काय? : ठाकरे या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राचे दुर्गवैभव’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. या पुस्तकाचा उल्लेख करत आपण दुर्गवैभवाकडून प्रेरणा घेतली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पूर्वी आग्रा होते, आता दिल्ली आहे, तिथल्या लोकांना आपण कसे पाणी पाजू शकतो याची प्रेरणा यातून घेतली नाही.