पुणे : वाइल्ड लाइफ कायद्यातील तरतुदींना अनुसरून सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे जिवंत नागांची पूजा करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. परिणामी खंडित झालेली नागपंचमी साजरी करण्याची येथील अनेक वर्षांची परंपरा पूर्ववत करण्याकरिता या कायद्यामध्येच बदल करू, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली.बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागांना पकडून त्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात. तसेच नागांची पूजाही करण्यात येते. त्याविरोधात निसर्गप्रेमींनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर वन्यजीव कायद्याच्या अधीन राहूनच नागपंचमी साजरी करावी असे आदेश न्यायालयाने जुलै २०१४ मध्ये दिले. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बत्तीस शिराळयातील गावकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जावडेकर यांची भेट घेतली.प्राण्यांसमवेत क्रूरतेचे वर्तन होऊ नये, याच्याशी आम्ही सहमत आहोत; मात्र बत्तीश शिराळा येथे नागपंचमीची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, ती अबाधित राहणे आवश्यक आहे. लोकांना नागाची पूजा करता आली पाहिजे. न्यायालयाने कायद्यातील तरतुदीनुसार त्यावर निर्बंध टाकले होते. त्यामुळे तो आम्ही बदलणार आहोत. पुढील वर्षाची नागपंचमी ही नवीन कायद्याच्या बदलानुसार होणार आहे. त्यामुळे आपण स्वत: नागपंचमी उत्सवास हजर राहू, असे जावडेकर म्हणाले. (प्रतिनिधी)शिराळा बंद मागेशिराळा : शिराळ्याच्या नागपंचमीसाठी हिवाळी अधिवेशनात कायद्यात बदल करून पुढील वर्षाची नागपंचमी शिराळकरांना पारंपरिक पद्धतीने साजरी करता येईल, असे ठोस आश्वासन प्रकाश जावडेकर यांनी दिल्यानंतर रविवारी शिराळा बंद मागे घेण्यात आला. नागपंचमीच्या प्रश्नावर गेले चार दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. तर चक्री उपोषणात मुस्लिम संघटनेसह नागरिक सहभागी झाले होते.
...तर बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीसाठी कायद्यात बदल
By admin | Published: July 06, 2015 1:52 AM