शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

'काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर...' नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 4:58 PM

Nana Patole Reaction on Sharad Pawar: शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यामध्ये झालेल्य गुप्त बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे.

 मुंबई - शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यामध्ये झालेल्य गुप्त बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. शरद पवार सोबत न आल्यास दोघांनी एकत्र येत  निवडणुका लढवता येतील का? याची चाचपणी काँग्रेस आणि ठाकरे गटाने केल्याचं वृत्त आहे. या दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  शरद पवार यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर जनतेत संभ्रम आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस कोअर कमिमीच्या  मुंबईत झालेल्या बैठकीनंतर  प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार व शरद पवार भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा टिप्पणी केली. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर जनतेत संभ्रम आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत आणि त्यांनी या भेटीवर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. इंडिया आघाडी सोबतच राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत, मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील.

काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात ३ सप्टेंबरपासून पदयात्रा सुरु होत असून या पदयात्रेची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. ४८ लोकसभा मतदारसंघातील निरिक्षकांच्या अहवालावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रात व राज्यातील भाजपा सत्तेला उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच आमचा प्लॅन आहे. महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचे राज्य आहे. काँग्रेस व मित्र पक्ष एकत्र लोकसभा निवडणुका लढल्या तर ४०-४५ जागा जिंकू शकू असे चित्र राज्यात आहे. त्यासाठी काँग्रेसची तयारी करत आहे. आमचे टार्गेट भारतीय जनता पक्ष आहे, जे पक्ष सोबत येतील त्यांच्यासह लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. शेतकरी, तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या नाहीत, व्यवसाय चालत नाहीत यातून पुण्यात २१८ तरुणांनी आमहत्या केल्या आहेत. राज्यातील इतर भागातही हीच परिस्थिती आहे पण लोकं मेली तरी चालतील पण सत्ता कायम राहली पाहिजे ही सत्तेला चिकटून बसण्याची भाजपाची प्रवृत्ती आहे.

पंतप्रधानांनी जनतेच्या जखमेवर मीठ चोळले स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करताना, महागाई परदेशातील परिस्थितीमुळे वाढली आम्ही वाढवली नाही असे खोटं सांगितले. मोदी सरकार देशातील आर्थिक स्थिती हाताळू शकले नाही म्हणूनच महागाई वाढली, रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत आहे तरिही महागाईचे खापर मात्र परदेशावर फोडून मोदींनी हात वर केले. मोदी सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या सरकारच्या काळात महिला अत्याचारही वाढले, सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. मोदी सरकारविरोधात जनतेत तीव्र संताप आहे पण मोदी मात्र पुन्हा येणार अशी घोषणा करतात, लोकशाहीत असा अहंकार चालत नाही, असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी