शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

मोदींचा फोटो असता तर तेलगी घोटाळा वाटला असता

By admin | Published: February 08, 2017 5:19 AM

गेली २५ वर्षे वचननामा शिवसेनेचा होता आणि विकास कामांवर फोटो मात्र भाजपाचा. डोकं कधी चालवलं नाही, पण खाजवायचं तरी

मुंबई : गेली २५ वर्षे वचननामा शिवसेनेचा होता आणि विकास कामांवर फोटो मात्र भाजपाचा. डोकं कधी चालवलं नाही, पण खाजवायचं तरी. भाजपाने जाहीरनाम्यावर स्टॅम्प पेपर दाखवला. मोदी का नाही दाखवले? मोदींचा फोटो असता, तर तेलगी घोटाळा वाटला असता, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घाटकोपर येथील सभेत भाजपाच्या जाहीरनाम्यावर केली. भाजपाने एवढी वर्षे शिवसेनेचा आयता वचननामा वापरला. शिवसेना जे वचन देते ते पूर्ण विचार करूनच देते. आम्ही शिवसेनाप्रमुखांना वंदन करून वचननामा मुंबईकरांसमोर ठेवला. रोड टॅक्स नाही, तर पथकर महापालिका घेते. पथकर हा मालमत्ता करात असतो, असा ठाकरे यांनी टोला भाजपाला लगावला. टॅब देत प्रगत प्रशिक्षण देणारी देशात पहिली महापालिका ही मुंबई महापालिका आहे. शिवसेनेने विद्यार्थ्यांचे भले केले की नाही हे विचारावे. २५ वर्षांत मान खाली घालावी लागेल, असे एकही काम शिवसेनेने केलेले नाही. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना गलिच्छ राजकारण पुढे आणत असाल, तर त्याला आम्हीही तयार आहोत, असे ठाकरे यांनी भाजपाला आव्हान दिले. कुणाची औकात कुणाला दाखवायची, हे शिवसैनिक दाखवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. या संदर्भात पटेल युती करण्यासाठी आला नव्हता. हार्दिक पटेल मातोश्रीवर आल्याने काहींच्या पोटात मात्र गोळा आला. मोदी आणि फडणवीस तुम्ही दोघेही एकत्र या, दोघांनाही एकत्र निपटून टाकतो, असे आव्हानही दिले. मुख्यमंत्र्यांनी राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे. तुम्ही काय केले हे सांगा आणि पारदर्शकतेवर बोला. कल्याण-डोंबिवली येथील २७ गावांची मुख्यमंत्र्यांनी तर फसवणूकच केली. वेगळी महानगरपालिका तयार करण्याच्या आश्वासनावरून मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली. त्यामुळे आम्हाला कुठल्याही स्टॅम्पपेपरची गरज नाही. दहशतवादी हल्ल्यात बळी कमी गेले, पण नोटाबंदीने अधिक बळी गेले. मग हा दहशतवादी हल्ला कुणी केला? असे सांगून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. (प्रतिनिधी)