Badlapur sexual abuse case Report: बदलापुरमधील एका नामांकित शाळेत दोन तीन आणि चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यानेच दोन्ही मुलींवर अनेकवेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. प्रचंड जनक्षोभ उसळल्यानंतर सरकारने प्रकार गांभीर्याने घेतले आणि चौकशी समिती नेमली. या समितीच्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी नोंदवण्यात आल्या आहेत.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "बदलापूर प्रकरणामध्ये मागील १५ दिवसांचे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहे. शिक्षण विभागाच्या समितीने केलेल्या चौकशीत हे समोर आले आहे. शाळेच्या पदाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती होती, पण त्यांनी कारवाई केली नाही."
"प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. त्याचे १५ दिवसांचे फुटेज रेकॉर्डिंग गायब आहे. त्याची आता चौकशी करत आहोत. मुलींच्या कुटुंबीयांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत", अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांना दिलासा, केसरकरांनी घेतली शिक्षणाची जबाबदारी
केसरकर म्हणाले, "आम्ही सध्या फक्त वस्तुस्थिती तपास आहोत. पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. पीडित मुलीला १० लाखांची मदत केली जाईल. ज्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला, तिला तीन लाखांची मदत करणार आहे."
"दोन्ही मुलींचा शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आम्ही घेऊ. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला धनादेशाच्या माध्यमातून देऊ. मुलीची ओळख उघड होणार नाही, याची काळजी घेऊन, दोन्ही मुलींना आम्ही मदत करू", अशी घोषणा केसरकर यांनी केली.
कामिनी कायकर, निर्मला बुरेना करणार सहआरोपी
शिक्षण विभाग समितीला तपासात असे आढळून आले की, कामिनी कायकर, निर्मला बुरे या दोन महिला कर्मचारी शाळेत कार्यरत आहेत.
त्यांच्याबद्दल दीपक केसरकर यांनी सांगितले की, "या कामिनी गायकर आणि निर्मला भुरे या दोन सेविकांवर लहान मुलांना शौचास नेण्याची जबाबदारी होती. त्या दोघी चौकशीसाठी आल्या नाहीत. त्यांना काही सांगायचं नाही, असे गृहित धरून पुढील कारवाईसाठी प्रकरण पाठवले आहे. त्या दोघी असत्या, तर ही घटना घडली नसती. त्यामुळे दोघींना सहआरोपी करण्यास सांगितले आहे", अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.