शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

इतरांनी केली तर खुद्दारी, पण आम्ही केल्यावर गद्दारी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 6:46 PM

इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, त्यांनाही कळलं असेल, त्यांचा भाऊ मातोश्रीवर राहतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई- इतरांनी केली तर खुद्दारी व आम्ही केली तर गद्दारी, त्यांनाही कळलं असेल, त्यांचा भाऊ मातोश्रीवर राहतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, सहा मनसे नगरसेवक अधिकृतरीत्या शिवसेनेचे झालेत, त्यांचे मी अभिनंदन करतो. एका दिवसात शिवसेना इतकी जमवाजमव करत असेल, तर ताकदीचा अंदाज आलाच असेल. आता फोडाफोडी झाली नाही, आधी झाली होती, जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आले आहेत. स्वतःही नगरसेवक परत येत असतील तर मी दार का बंद करून घेऊ, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आम्ही दुस-या पक्षातून नगरसेवक घेतले तर मित्र पक्षाच्या पोटात दुखायचं कारण काय ?, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपानं आमच्या आनंदात सहभागी झालं पाहिजे. घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. 

भांडुप पोटनिवडणुकीनंतर हालचालीकाल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं  एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.

भाजप बॅकफुटवरशिवसेनेच्या या खेळीनं भाजप सध्या बॅकफूटवर गेलं आहे. तर मनसे अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवकअर्चना भालेराव – वॉर्ड 126परमेश्वर कदम – वॉर्ड 133अश्विनी मतेकर- वॉर्ड 156दिलीप लांडे – वॉर्ड 163संजय तुर्डे – वॉर्ड 166हर्षल मोरे – वॉर्ड 189दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197वॉर्ड क्र. 166चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.

शिवसेनेकडून घोडेबाजार‘पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरु झाला आहे. यासंबंधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रारही केली आहे. जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहात आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करु.’ अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

पोटनिवडणुकीमुळे शिवसेना-भाजपची चढाओढमुंबईतील प्रभाग क्र. 116 मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचं संख्याबळ 83 तर शिवसेनेची संख्या 84 झाली आहे. मात्र शिवसेनेला 4 अपक्ष तर भाजपला 2 अपक्षांची साथ आहे.

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं होतं 

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबलशिवसेना अपक्षांसह – 84 +  4 अपक्ष = 88भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85कॉंग्रेस – 30राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9मनसे – 7सपा – 6एमआयएम – 2