पुणे : ’सभ्य’ किंवा‘सुसंस्कृत’ समाजामधील सर्व लोक ही ’उदारमतवादी’ आणि ‘धोती’, ‘कुडता’ वेश परिधान केला तर आम्ही ‘असभ्य’ आणि ‘असंस्कृत’ अशी मिश्कील टिप्पणी करीत, आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जाते, अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. दखनी अदाब फौंडेशनतर्फे ‘ डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’चे उदघाटन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदा सत्यपाल सिंह, प्रसिद्ध दिगदर्शक विशाल भारद्वाज, साखर आयुक्त सौरभराव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनोज ठाकूर उपस्थित होते. यावेळी मोनिका सिंग यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ’’सभ्य’ समाजामध्ये ‘उदारमतवादा’ताच्या नावाखाली वावरणा-या मंडळीना कोश्यारी यांनी चांगलेच लक्ष्य केले. केवळ आम्हीच उदारमतवादी; बाकीचे प्रतिगामी, असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे. लोक स्वत:च स्वत:ला उदारमतवादी म्हणून जाहीर करतात. समोरची व्यक्ती आपल्या विचारांशी मिळती-जुळती नाही म्हणून ती प्रगतिशील वाटत नाही. त्या व्यक्तीची प्रगती कशी होईल, हा विचार करायचा सोडून तिच्यावर जातीय, धर्मांध, पुराणमतवादी असे शिक्के मारून कसे चालेल ? किमान साहित्यिक आणि कलाकारांनी तरी हे उद्योग करू नयेत, असा सल्ला ही कोश्यारी यांनी दिला. ’ साहित्य’ हा समाजाचा आरसा असतो. मात्र लेखणी आणि चित्रपटाचा परिणामदेखील समाजमनावर होत असतो. त्यामुळे या दोन्हींमध्ये खूप मोठी ताकद आहे. एखादा निर्माता आणि साहित्यिक या ताकदीचा उपयोग कसा करतात हा प्रश्न आहे. देश एकसंध राहाण्यासाठी आणि देशाबददलचा अभिमान जागृत ठेवण्यासाठी साहित्यिक आणि कलाकार नक्कीच योगदान देऊ शकतात. त्यांच्या प्रयत्नातून नवनीत समोर येऊ शकेल आणि समाजाला नवी दिशा मिळू शकेल, असा विश्वासही कोश्यारी यांनी व्यक्त केला.
‘धोती -कुडता’ परिधान केला तर आम्ही असभ्य, असंस्कृत का ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 9:35 PM